IND vs NZ : पावसाची इनिंग सुरुच, 'या' वेळेपर्यंत सामना होणार नाही रद्द

IND vs NZ : पावसाची इनिंग सुरुच, 'या' वेळेपर्यंत सामना होणार नाही रद्द

ICC Cricket World Cup : पावसानं आता विश्रांती घेतली असली तरी, 50 ओव्हरचा सामना होऊ शकणार नाही आहे.

  • Share this:

ट्रेंट ब्रिज, 13 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ आज न्यूझीलंडच्या सामन्यावर आता पावसाचे संकट आहे. विजयाची हॅट्रीक साधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय संघावर पावसामुळं बिकट परिस्थिती येणार आहे. आज सामना होत असलेल्या ट्रेंट ब्रीज स्टेडियमवर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं सामना होणार की नाही, हा प्रश्न चाहत्यांपुढे आहे.

वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना होणार आहे. न्यूझीलंडच्या संघानं आतापर्यंत तीनही सामने जिंकले आहेत, त्यामुळं गुणतालिकेत ते सध्या पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, भारताचा संघ दोन सामने जिंकत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज येथे आज वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड सामना होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याची चर्चा गेले दोन दिवस रंगत आहे आणि आजच्या हवामानाचा अंदाज घेतल्यास हा सामना रद्द होण्याच्या मार्गावर आहे.तसेच, पाऊस थांबला तरी सामना होणार की नाही याबाबत प्रश्न कायम आहे. कारण हर्षा भोगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाऊस थांबला तरी, मैदान सुकण्यासाठी सुर्यप्रकाश नसल्यामुळं मैदान सुकवणार कसे हा प्रश्न कायम आहे. तसेच सध्या नॉटिंगहममध्ये थंड वातावरण असल्यामुळं खेळाडूंनाही या वातावरणाचा त्रास होणार आहे. दरम्यान भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी वर्ल्ड कपमध्ये एकही सामना जिंकलेला नाही. मात्र, पावसामुळं आता या दोन्ही संघांना केवळ एक-एक गुण मिळणार आहेत.8.45पर्यंत होऊ शकतो सामना

भारतीय वेळेनुसार या दोन्ही संघांचा सामना 8.45पर्यंत होऊ शकतो. सामना होणार की नाही याचा निर्णय 8.45नंतर घेतला जाईल. आताही सामना खेळला जाऊ शकतो, मात्र सामना 20 ओव्हरपर्यंत खेळला जाऊ शकतो. आयसीसीच्या नियमानुसार, सामना फार फार तर 20 ओव्हरपर्यंत खेळला जाऊ शकतो.

मैदानावरच आला पूर

ट्रेंट ब्रीजचे मैदान हे सर्वात चांगले मैदान म्हणून ओळखले जाते. मात्र या पावसामुळं या मैदानात पाणी भरले आहे. त्यामुळं पाऊस थांबला असला तरी, मैदान सुकवने कठीण जाणार आहे. सात वाजता पंचानी या मैदानाची पाहणी केली आहे.

...तर सामना 50 ओव्हरचा होणार नाही

सध्या पाऊस थांबला असला तरी, पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळं आता नाणेफेकही उशीरानं होणार आहे. दरम्यान पावसानं पुन्हा व्यत्यय आणला तर, सामना 50 ओव्हरचा होणार नाही. कमी षटकारांचा सामना खेळला जाऊ शकतो.


SPECIAL REPROT : भारत करणार का किवींची शिकार? पण 'हे' विसरून चालणार नाही!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 07:30 PM IST

ताज्या बातम्या