World Cup : टीम इंडियाची अग्निपरिक्षा 10 दिवसात, 4 सामन्यात होणार फैसला

गुरुवारी वेस्ट इंडिज विरोधात भिडल्यानंतर भारत 30 जून रोजी इंग्लंड, बांगलादेश विरोधात 2 जुलै तर श्रीलंकेविरोधात 6 जुलैला खेळणार.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 11:49 AM IST

World Cup : टीम इंडियाची अग्निपरिक्षा 10 दिवसात, 4 सामन्यात होणार फैसला

लंडन, 25 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाचा प्रवास पाहता विराटसेनेला सेमीफायनलचे तिकीट मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, 9 गुणांसह गुणतालिकेत सध्या तिसऱ्या क्रमांकालर आहे. भारतानं दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांना नमवले आहे तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा खेळणाऱ्या भारतीय संघानं 5 जून रोजी आपला पहिला सामना खेळला होता. भारतानं इतर संघाच्या तुलनेत आतापर्यंत कमी सामने खेळले आहेत. त्यामुळे आता येत्या 10 दिवसांत भारतीय संघ 4 मुख्य सामने खेळणार आहे. याता आता गुरुवारी वेस्ट इंडिज विरोधात भारतीय संघ भिडेल.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये राऊंड रॉबीन पध्दतीचा वापर होत असल्यानं प्रत्येक संघाला सर्व सामने चांगल्या रनरेटनं जिंकणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक संघाचे एकूण 9 सामने होतील सध्या भारत वगळता सर्व संघाचे 7 सामने झाले आहेत. त्यामुळं काही दिवसात सेमीफायनलचे चित्र स्पष्ट होईल. गुरुवारी वेस्ट इंडिज विरोधात भिडल्यानंतर भारत 30 जून रोजी इंग्लंड, बांगलादेश विरोधात 2 जुलै तर श्रीलंकेविरोधात 6 जुलैला खेळणार.

दरम्यान अफगाणिस्तान विरोधात वगळता भारतानं इतर सर्व सामने आरामात जिंकले आहेत. अफगाणिस्तान विरोधात भारताला शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. इंग्लंडबरोबर होणारा सामना रोमांचक होणार यात काही वाद नाही. मात्र बांगलादेश, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज भारताला चांगली टक्कर देऊ शकतात.

बांगलादेश खरा जायंट किलर

बांगलादेशचा संघ यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खऱ्या अर्थानं जायंट किलर ठरला आहे. सध्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या या संघानं आतापर्यंत मोठ्या देशांनाही पाणी चारले आहे. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांना नमवत, बांगलादेशचा संघ सेमी फायनलच्या दिशेने आगेकुच करत आहे.

Loading...

कोणत्याही संघाला कमी लेखणं पडेल भारी

भारताचे चार सामने बाकी आहेत. मात्र कोणत्याही संघाला कमी लेखने भारताला महागात पडू शकते. वेस्ट इंडिज संघानं न्यूझीलंडला शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी अडवून ठेवले. तर, दुसरीकडे श्रीलंकेच्या संघानं बलाढ्या इंग्लंडला नमवले. त्यामुळं या दोन्ही संघांविरुद्ध भारताला चांगली खेळी करावी लागणार आहे.

अफगाणिस्तान विरोधात झालेल्या चूका सुधाराव्यात

अफगाणिस्ता विरोधात भारताची फलंदाजी ढासळलेली दिसून आली. त्यामुळं भारताच्या मधल्या फळीनं अजून जोमानं काम करण्याची गरज आहे. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांची सलामीची जोडी आता चांगली झाली आहे. मात्र चौथ्या क्रमांकाच तिढा मात्र कायम आहे.

भारताची गोलंदाजी दमदार

अफगाणिस्तान विरोधात भारताची फलंदाजी फेल ठरली असली तरी, भारताची गोलंदाजी सर्वोत्तम होती. बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी भारताला या सामन्यात विजय मिळवून दिला. या सामन्यात शमीनं शेवटच्या षटकात हॅट्रीक घेत, भारताला विजय मिळवून दिला.

वाचा- World Cup Point Table : बांगलादेश ठरणार जायंट किलर, भारतालाही धोका

वाचा- World Cup: 'भारताकडून पराभव झाल्यानंतर आत्महत्या करावी वाटली'

वाचा-अर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये करतोय इंग्लंडला मदत, 'हे' आहे कारण

बेस्टला अच्छे दिन येणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 11:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...