World Cup : वर्ल्ड कपमधून बाहेर तरी टीम इंडिया बनली करोडपती!

World Cup : वर्ल्ड कपमधून बाहेर तरी टीम इंडिया बनली करोडपती!

वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं भारताला 18 धांवांनी पराभूत केले. त्यामुळं भारताचे फायनलचे स्वप्न भंगले आहे.

  • Share this:

मॅंचेस्टर, 11 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं पराभूत केल्यामुळं भारतीय संघाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळं सध्या सोशल मीडियावर भारतीय संघाची जोरदार चर्चा होत आहे. मात्र, सेमीफायनलमध्ये मिळालेल्या पराभवानंतरही टीम इंडिया करोडपती बनली आहे. 14 जुलै रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर वर्ल्ड कपचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारताला ट्रॉफी आणि 5.5 कोटी देण्यात येणार आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या तरी संघांना जास्त किमतीचे बक्षिस देण्यात येणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं भारताला 18 धांवांनी पराभूत केले. त्यामुळं भारताचे फायनलचे स्वप्न भंगले आहे. असे असले तरी, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आयसीसीच्या वतीनं बक्षिसाची रक्कम वाढवण्यात आली आहे. वर्ल्ड कप 2019मध्ये फायनल जिंकणाऱ्या संघाला 28 कोटी, एक ट्रॉफी आणि क्रिकेटपटूंना बॅज देण्यात येणार आहेत. तर, वर्ल्ड कपमध्ये उपविजेत्या संघाला 14 कोटी रुपये बक्षिस स्वरूपात देण्यात येणार आहेत. तसेच, सेमीफायनल खेळणाऱ्या संघांना प्रत्येकी 5.50 कोटी देण्यात येणार आहेत.

विजेत्या संघाला मिळणार खोटी ट्रॉफी

वर्ल्ड कपमध्ये विजेत्या संघाला मिळणारी ट्रॉफी 11 किलोग्राम वजनाची आहे. सोने आणि चांदी यांच्यापासून ही बनवण्यात येते. मात्र. मात्र आयसीसी खरी ट्रॉफी आपल्याकडे ठेवते तर, एक दुसरी ट्रॉफी विजेत्या संघाला देते.

सगळ्यात महागड्या स्पर्धा

बक्षिसांच्या रकमेबाबत बोलायचे झाल्यास चॅम्पियन फुटबॉल लीगमध्ये विजेत्या संघाला 150 कोटींचे बक्षिस मिळते. तर, बॉस्केटबॉल संघाला 139 कोटींचे बक्षिस दिले जाते. या दोन्ही स्पर्धांच्या तुलनेत क्रिकेट स्पर्धांना कमी बक्षिस मिळते.

वाचा- World Cup: धोनीच बाद होणं लागलं जिव्हारी, चाहत्याचा झाला मृत्यू!

वाचा- WORLD CUP : टीम इंडियाने सामना हरला पण तरीही भारतच चॅम्पियन!वाचा- World Cup : पराभवानंतर धोनीला केन विल्यम्सननं दिली ही ऑफर, पाहा VIDEO

VIDEO: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 03:52 PM IST

ताज्या बातम्या