World Cup : हार्दिक पांड्यांची सुपरफास्ट खेळी! सुपर सिक्सचा VIDEO व्हायरल

World Cup : हार्दिक पांड्यांची सुपरफास्ट खेळी! सुपर सिक्सचा VIDEO व्हायरल

पांड्याने फक्त 27 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 48 धावा केल्या.

  • Share this:

ओव्हल, 10 जून : ICC Cricket World Cup 2019 दक्षिण आफ्रिकेनंतर, भारतानं कांगारुंची शिकार केली, त्यामुळं वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ सध्या विजय घौडदौडीवर आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवत 36 धावांनी आपला दुसरा विजय मिळवला. या सामन्यात शिखर धवनची 117 धावांची खेळी महत्त्वाची ठरली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारचानं प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला यात. सलामीला आलेल्या रोहित शर्मा-शिखर धवन यांच्या शतकी भागीदारीमुळं भारताला चांगली सुरुवात मिळाली. भारताची सलामीची जोडी शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी 127 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा अर्धशतक करून बाद झाला. त्यानंतर शिखर धवनने शतक साजरं केलं. धवन बाद झाल्यावर चौथ्या क्रमांकावर केएल राहुल येणं अपेक्षित होतं. मात्र, त्याच्या ऐवजी थेट अष्टपैलू हार्दीक पांड्या फलंदाजीला मैदानात आला.

कोहलीने केएल राहुलऐवजी पांड्याला वरती फलंदाजीला पाचारण केल्यानं सर्वांनाच धक्का दिला. पांड्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत तुफान फटकेबाजी केली. पांड्याने फक्त 27 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 48 धावा केल्या. हार्दीक पांड्या आणि कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी 53 चेंडूत 81 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर भारताने 300 धावांचा टप्पा पार केला आणि ऑस्ट्रेलियासमोर 353 धावांचे आव्हान उभा केले.

वाचा-World Cup : मैदान तर जिंकलं, पण चाहत्यांच्या 'या' कृतीमुळे विराटनं मागितली स्मिथची माफी

वाचा- Point Table : विराटसेनेची विजयी घौडदौड, पण गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर 'हा' संघ

वाचा-20 साल बाद... ओव्हलवर त्या खेळीची आठवण पुन्हा ताजी

वाचा- World Cup : ‘ही’ आकडेवारी सांगते विराटसेनाच होणार जग्गजेता !

VIDEO : बलात्कार प्रकरणी भाजप मंत्र्याचं धक्कदायक विधान

First published: June 10, 2019, 12:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading