World Cup : इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा ICCचा 'हा' नियम आहे तरी काय?

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला अंतिम सामना टाय होऊन सुपरओव्हर पर्यंत गेला, त्यानंतर ही सुपर ओव्हरही टाय झाली.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 08:57 AM IST

World Cup : इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा ICCचा 'हा' नियम आहे तरी काय?

लोर्ड्स, 15 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये इंग्लंड आणि न्यूजीलंड यांच्यात रोमांचक अंतिम सामना झाला. हा रोमांच एवढा होता की सामना टाय होऊन सुपरओव्हर पर्यंत गेला, त्यानंतर ही सुपर ओव्हरही टाय झाली. त्यामुळे यजमान इंग्लंड यांना सामान्यात सर्वात जास्त चौकार लगावल्यामुळे चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळाला. दरम्यान वर्ल्ड कपच्या इतिहासात चारवेळा अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या इंग्लंडने पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.

मात्र, असे असले तरी न्यूजीलंडचा संघ विजयाच्या जास्त जवळ होता. न्यूजीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे न्यूजीलंडने 8 विकेट गमावत 241पर्यंत मजल मारली. दरम्यान या आव्हानाचा पाठलाग करताना बेन स्टोकने 84 धावांची वादळी खेळी केली. बेनच्या खेळीच्या जोरावर शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडला 15 धावांची गरज असताना यजमानांना केवळ 14 धावा करता आल्या. यात गुप्टीलनं केलेला ओव्हरथ्रो न्यूजीलंडला महागात पडला. दरम्यान त्यानंतर झालेल्या सुपरओव्हरमध्येही दोन्ही संघांनी 15 धावा केल्या. मात्र इंग्लंडला सर्वात जास्त चौकार लगवल्यामुळे चॅम्पियन होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.

आयसीसीच्या नियमानुसार सुपरओव्हर टाय झाल्यास ज्या संघाने सामन्यात सर्वात जास्त चौकार लगावले आहेत त्यांना विजयी घोषित केले जाते. न्यूजीलंडने फलंदाजी करताना 2 षटकार आणि 14 चौकार लगावले तर इंग्लंडने 2 षटकार आणि 22 चौकार लगावले. हा नियमानुसार पहिल्यांदाच विजयी संघ घोषित करण्यात आला.

सुपर ओव्हरचा नियम

-शेवटी फलंदाजी करणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी करतो.

-क्षेत्ररक्षण करणारा संघ कोणत्या दिशेने गोलंदाजी करणारा.

-तसेच, सुपर ओव्हरच्या खेळीत 2 विकेट गेल्यास खेळ त्या संघाचा खेळ समाप्त होतो.

-सुपर ओव्हरमध्ये सामना टाय झाल्यास जास्त चौकार लगावणारा संघ सामना जिंकतो.

वाचा- सचिनच भारी; या World Cupमध्येही मोडता आला नाही मास्टर ब्लास्टरचा विश्वविक्रम!

वाचा- World Cup : जग्गजेता ठरवणारी सुपर ओव्हर, पाहा VIDEO

वाचा- World Cup केन विल्यम्सनने पटकावला मालिकावीरचा बहुमान!

दोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 08:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...