World Cup : मयंक अग्रवाल इंग्लंडला पोहचलाच कसा? निवड समितीवर भडकले गावस्कर

World Cup : मयंक अग्रवाल इंग्लंडला पोहचलाच कसा? निवड समितीवर भडकले गावस्कर

विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतर मयंक अग्रवालला शेवटच्या साखळी सामन्याआधी इंग्लंडला पाठवण्यात आले होते.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सेमीफायनलमध्ये भारताला पराभवाचा धक्का बसल्यानंतर निवड समितीवर चहुबाजूंनी टिका होत आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात केवळ 24 धावांत भारताचे चार फलंदाज बाद झाले होते. आघाडीचे फलंदाज ढेपाळल्यानंतर मधल्या फळीलाही चांगली फलंदाजी करता आली नाही. चौथ्या क्रमांकावर आलेला ऋषभ पंत चांगली फलंदाजी करत असतानाच बेजाबाबदारपणे शॉट खेळून बाद झाला. त्यामुळं भारताची खेळी डगमगली. त्यामुळं वर्ल्ड कपमधली भारताचा चौथ्या क्रमांकाची चिंता पुन्हा एकदा समोर आली.

यातच आता भारतीय संघाचे कर्णधार सुनील गावस्कर यांनी निवड समितीवर टिका केली आहे. त्यांनी मयंक अग्रवालला संघात सामिल का केले, असा सवाल केला आहे. सुनील गावस्कर यांनी "विजय शंकर दुखापतीमुळं बाहेर पडल्यानंतर अंबाती रायडूला संघात घ्यायला हवे होते. मयंक अग्रवाल इंग्लंडला गेलाच कसा", अशा शब्दात निवड समितीवर टिका केली आहे.

अंबाती रायडूला संघात स्थान का नाही?

न्यूझीलंड विरोधात सेमीफायनलमध्ये भारताला मिळालेल्या पराभवानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना, निवड समितीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. "मयंक अग्रवालनं आतापर्यंत एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. शेवटच्या सामन्यात त्याला इंग्लंडमध्ये रवाना केले. पण मग जर अंबाती रायडू राखीव होता. तर त्याला संघात स्थान का नाही दिल", असा सवाल गावस्कर यांनी केला आहे.

चौथ्या क्रमांकाचा फ्लॉप शो

वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यापासून चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा प्रश्न कायम होता. टीम इंडियानं वर्ल्ड कपमध्ये एकूण चार फलंदाजांना चौथ्या क्रमांकावर खेळवले. मात्र चौथ्या क्रमांकावरच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

शास्त्रींनी सांगितले पराभवाचे कारण

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी, "चौथे स्थान हे आमच्यासाठी या वर्ल्ड कपमध्ये चिंतेचा विषय राहिला आहे. सुरुवातीला केएल राहुलला या स्थानावर संधी दिली होती. मात्र, शिखर धवन जखमी झाल्यानंतर राहुलला सलामीसाठी उतरवण्यात आले. त्यानंतर विजय शंकरही जखमी झाला. त्यामुळं चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आमच्यासमोर कायम होता". त्यामुळं आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर भारताला मधली फळी सावरू शकली नाही. अखेर जडेजा आणि धोनीनं भारताची बाजू सावरली. दोघांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. मात्र जडेजा आणि धोनी भारताचा पराभव रोखू शकले नाही.

वाचा- IPLचा 'हा' नियम वर्ल्ड कपमध्ये का नाही? विराटचा ICCला सवाल

वाचा- World Cup : विराट नाही तर वर्ल्ड कपनंतर रोहितकडे असणार कर्णधारपद?

वाचा- World Cup : हिटमॅनची एक धाव, फायनलमध्ये दोन फलंदाजांना शतकाची गरज!

VIDEO: जगबुडीचं रौद्र रूप! मुसळधार पावसामुळे नदीनं ओलांडली धोक्याची पातळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 12:46 PM IST

ताज्या बातम्या