world Cup : हार्दिकला पाहिल्यानंतर स्टीव्ह वॉला आली या दिग्गज खेळाडूची आठवण!

world Cup : हार्दिकला पाहिल्यानंतर स्टीव्ह वॉला आली या दिग्गज खेळाडूची आठवण!

ICC Cricket World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉने हार्दीक पांड्याची तुलना दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडूशी केली.

  • Share this:

लंडन, 11 जून : वर्ल्ड कपमध्ये भारताने पहिले दोन्ही सामने जिंकले असून तिसऱी लढत न्यूझीलंडशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने वेगवान खेळी केली. त्याच्या या खेळीचे कौतुक केले जात आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने त्याची तुलना दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू लांस क्लूजनरशी केली आहे. लांस क्लूजनरच्या 1999 च्या वर्ल्ड कपमधील कामगिरीशी पांड्याची तुलना केली. स्टीव्ह वॉ म्हणाला की, पांड्याकडे अशी क्षमता आहे की त्याला रोखण्याची रणनिती प्रतिस्पर्धी संघांकडे नाही.

क्लूजनर उत्तुंग षटकारांसाठी ओळखला जात होता. ज्यावेळी टी 20 ला सुरुवात झाली नव्हती तेव्हा त्याने षटकारांची आतषबाजी केली होती.पांड्याने रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हलवर 27 चेंडूत 48 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे भारताची शेवटच्या षटकात धावगती वाढली आणि ऑस्ट्रेलियाला 353 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला 316 धावा करता आल्या.

स्टीव्ह वॉने म्हटले की, हार्दीक पांड्याचा खेळ विरोधी संघांना धक्का देणारा आहे. तो 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या लांस क्लूजनरच्या खेळासारखा आहे. इंग्लंडमध्ये 20 वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत क्लूजनर मालिकावीर ठरला होता. त्याने वर्ल्ड कपमध्ये 122 च्या स्ट्राइक रेटने 281 धावा केल्या होत्या.

हार्दीक पांड्या फटकेबाजी करताना त्याच्यासोबत कर्णधार विराट कोहली मैदानात दुसऱ्या बाजूला होता. विराट कोहली पांड्याबद्दल म्हणाला की, मी मैदानात तर पांड्याच्या सहाय्यकाची भूमिका बजावली. पांड्यानेच मला धोका न पत्करता खेळण्यास सांगून स्वत: फटकेबाजी केली.

वाचा- अखेर पावसामुळं दक्षिण आफ्रिकेनं उघडले खाते, भारत तिसऱ्या क्रमांकावर

वाचा- भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट

वाचा- बॅडमिंटनपटूला विराटच्या कोचने केलं क्रिकेटपटू, आता 'ती' खेळणार वर्ल्ड कप

पूर्वमोसमी पावसामुळे मुंबईत विमानसेवा विस्कळीत, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

First published: June 11, 2019, 6:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading