World Cup : लंकेचा डंका, अफगाणिस्तानवर 34 धावांनी विजय

World Cup : लंकेचा डंका, अफगाणिस्तानवर 34 धावांनी विजय

ICC Cricket World Cup 2019 : AFG vs SL पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार अफगाणिस्तानला 187 धावांचे आव्हान दिलं होतं.

  • Share this:

कार्डिफ, 04 जून : श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात पावसाच्या व्यत्ययानंतर अफगाणिस्तानला 41 षटकांत 187 धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 152  धावांपर्यंतच मजल मारू शकला. हजरतुल्लाज झाजइने 30 , नजीबुल्लाह झारदनने 43 धावा केल्या. कर्णधार नैबने 32 धावा केल्या यांच्या व्यतिरिक्त इतरांना धावा करता आल्या नाहीत.लंकेकडून नुवान प्रदीपने 4 विकेट घेतल्या. तर मलिंगाने 3 विकेट घेतल्या. तत्पूर्वी,आयसीसी क्रिकेट वर्ल़्ड कपमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे थांबवण्यात आला. त्यावेळी लंकेच्या 33 षटकांत 8 बाद 182 धावा झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा खेळताना लंकेचे शेवटचे 2 फलंदाज 19 धावांची भर घालून बाद झाले. अफगाणिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना लंकेची घसरगुंडी उडाली. सामन्याच्या 22 व्या षटकात त्यांनी 3 गडी गमावले. कर्मधार दिमुथ करुणारत्नेनं 30 तर कुसल परेरा यांनी 78 धावा केल्या. पावसामुळे सामना 41 षटकांचा करण्यात आला. मात्र, श्रीलंकेला अफगाणिस्तानने 201 धावांमध्ये गुंडाळलं. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार अफगाणिस्तानला 41 षटकांत 187 धावाचं आव्हान मिळालं.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीच्या जोडीने 92 धावांची भागिदीरी केली. मोहम्मद नबीने ही जोडी फोडून लंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर लाहिरू थिरिमाने, कुशल मेंडिस आणि अॅंजेलो मॅथ्यूज यांना एकाच षटकात बाद करून नबीने लंकेची मधली फळी गारद केली. एका बाजूने कुशल परेराने फटकेबाजी सुरुच ठेवली. मॅथ्यूज बाद झाल्यानंतर लंकेचे पुढचे तीन फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले.

आयसीसी वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यात पराभवाची चव चाखलेल्या अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत होत आहे. जायंट किलर ठरलेल्या बांगलादेशच्या संघानं दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत सर्वांनाच धक्का दिला. अशाच काही अपेक्षा आहेत त्या अफगाणिस्तान संघाकडून. मात्र अफगाणिस्तान संघानं आपल्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे.

दरम्यान, शनिवारी झालेल्या लढतीत न्यूझीलंडनं श्रीलंकेला 10 गडी राखून नमवले. कर्णधार दिमुथ करुणारत्ने वगळता एकाही फलंदाजाला 30 धावा करता आल्या नाहीत. तर, दुसरीकडे जिगरबाज खेळाडूंचा भरणा असलेल्या अफगाणिस्तानला पहिल्याच सामन्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी जिद्दीने खेळ करत ऑस्ट्रेलियाला झुंज दिली. त्यामुळं आजच्या साम्यात त्यांच्याकडून अपेक्षा जास्ता आहेत. याआधी 2015च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने अफगाणिस्तानला पराभूत केले होते, त्याचा वचपा घेण्याची संधी यावेळी अफगाणिस्तानकडे असणार आहे.

यांच्यावर आहे अफगाणिस्तानची मदार

एकदिवसीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या मोहम्मद नबीकडून अफगाणिस्तानला यावेळी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, तर सध्याचा विश्वातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशीद खानपासून श्रीलंकेला सावध राहावे लागणार आहे. रशीद गोलंदाजीशिवाय फलंदाजीतही उपयुक्त योगदान देऊ शकतो.

वाचा-World Cup : विराटसेनेची कमाल! एकही सामना न खेळता पोहचला 7व्या क्रमांकावर, 'हे' आहे कारण

असा असेल अफगाणिस्तान : गुलाबदीन नैब (कर्णधार), मोहम्मद शहझाद, नूर अली झादरान, हझरतुल्ला झाझाई, रहमत शाह, असगर अफगाण, हशमतुल्ला शाहिदी, नजीबुल्ला झादरान, समीउल्ला शिनवारी, मोहम्मद नबी, रशीद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हमीद हसन, मुजीब उर रहमान.

वाचा-World Cup : विराटपुढे धर्मसंकट ! कोणत्या 11 खेळाडूंना मिळणार दक्षिण आफ्रिकेविरोधात संधी

असा असेल श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार) लसिथ मलिंगा, अविष्का फर्नाडो, लाहिरु थिरिमाने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, अ‍ॅँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी’ सिल्व्हा, जेफ्री वॅँडरसे, थिसारा परेरा, इसुरू उडाना, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस, मिलिंदा सिरिवर्दना.

वाचा- भारतीय क्रिकेटपटूची डोपिंग चाचणी, वर्ल्ड कपमधला 'असा' एकमेव खेळाडू

CET परीक्षेचा आज निकाल, यासोबतच इतर महत्त्वाचा 18 घडामोडी

First published: June 4, 2019, 9:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading