SL vs PAK : पाकिस्तान आणि श्रीलंका सामन्याला बसला पावसाचा फटका

पाकने श्रीलंकेविरुद्ध 1975 पासून विश्वचषकात सर्व सामने जिंकले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 05:12 PM IST

SL vs PAK : पाकिस्तान आणि श्रीलंका सामन्याला बसला पावसाचा फटका

ब्रिस्टल, 07 जून : श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकला आहे. मात्र श्रीलंकेच्या संघानं इंग्लंडला नमवून विजयाची चव चाखली, त्यामुळं आता पाकिस्तानलाही नमवतं आपली विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र या सामन्याला पावसाचा फटका बसला आहे, त्यामुळं नाणेफेकही होऊ शकलेली नाही. दुसरीकडे वेस्ट इंडिजकडून सलामीला पराभूत झालेल्या पाकिस्ताननं दरमदार कमबॅक करत, यजमान इंग्लंड संघाला 14 धावांनी पराभूत केले होते.

इंग्लंडविरुद्ध पाककडून फलंदाजीत मोहम्मद हाफिज, बाबर आझम आणि सर्फराज अहमद यांनी चमक दाखविली तर गोलंदाजीत वहाब रियाज, मोहम्मद आमीर आणि शादाब खान यांनी भेदक मारा केला होता. पाकने श्रीलंकेविरुद्ध 1975 पासून विश्वचषकात सर्व सामने जिंकले आहेत.दुसरीकडे न्यूझीलंडकडून लंकेला दहा गड्यांनी पराभवाचे तोंड पहावे लागले. पावसाच्या व्यत्ययातील दुसऱ्या सामन्यात मात्र लंकेने अफगाणिस्तावर विजय साजरा केला होता. लंकेला पाकविरुद्ध मधल्या फळीचे अपयश टाळावे लागेल. मात्र पावासामुळं सामन्याची परिस्थिती बदलणार आहे.
Loading...

पावसामुळं सामना होणार रद्द ?

ब्रिस्टलमध्ये पावसाचे सावट असल्यामुळं दोन्ही संघांना याचा तोटा होऊ शकतो. त्यामुळं या सामन्यात जो संघ टॉस जिंकेल, त्याला सामन्याची जिंकण्याची संधी असले. त्या संघाचे पारडे जड असणार आहे. पावसामुळं मैदानावर दव वाढेल. तसेच हवामान खात्यानुसार आज दिवसभर ब्रिस्टलमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. जर हा सामना रद्द झाला तर, दोन्ही संघांना एक-एक गुण दिले जातील.

श्रीलंका-पाकिस्तान हेड टू हेड

दोन्ही संघांनी आतापर्यंत 153 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात पाकिस्ताननं 90 तर, श्रीलंकेनं 58 सामने जिंकले आहेत. तर, वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघांनी 7 सामने खेळले आहेत. यात सातही सामने पाकिस्तानच्या संघाने जिंकले आहे.

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-धोनीच्या मुद्द्यावरून पाकिस्तानात रणकंदन ; ‘तो क्रिकेट खेळायला गेला आहे, महाभारतासाठी नाही'

वाचा- #DhoniKeepTheGlove : ‘पाकिस्तानच्या खेळाडूंचा नमाज चालतो, मग धोनीचे ग्लोव्ह्ज का नाही’ ; चाहते संतापले


VIDEO : World Cup मध्ये भारताचे सामने फिक्स? पहिल्या विजयानंतर 'या' अफवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 05:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...