IND vs ENG : शोएब अख्तर झाला लाचार, मागितली भारताकडे मदत

पाकिस्तानला सेमीफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी भारतावर अवलंबून रहावे लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 30, 2019 01:18 PM IST

IND vs ENG : शोएब अख्तर झाला लाचार, मागितली भारताकडे मदत

बर्मिंगहॅम, 30 जून: ICC Cricket World Cupमध्ये आज रविवारी होणाऱ्या भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) सामन्यासाठी दोन्ही संघ विजयाच्या निश्चियाने मैदानात उतरतील. इंग्लंडसाठी सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यांचे केवळ दोनच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलसाठीची जागा निश्चित करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. तर भारतीय संघाचे 3 सामने शिल्लक आहेत. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाला एक विजय पुरेसा आहे.

मात्र, भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना केवळ भारत आणि इंग्लंडचे चाहते पाहणार नाहीत. तर पाकिस्तान आणि बांगलादेशमधील क्रिकेट चाहते देखील हा सामना डोळ्यात तेल घालून पाहतील. भारताच्या विजयात पाकिस्तान आणि बांगलादेशचे स्पर्धेतील भविष्य ठरणार आहे. भारताने इंग्लंडचा पराभव केल्यास पाक आणि बांगलादेशचे सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा शिल्लक राहतील. त्यामुळं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यानं भारताकडे मदत मागितली आहे. त्याने आपल्या व्हिडिओमध्ये भारतानं इंग्लंड विरोधात सामना जिंकावा ज्यामुळं पाकिस्तानचे आव्हान कायम राहिलं, अशी मागणी केली आहे. तसेच अख्तरनं सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना व्हावा अशी इच्छाही बोलून दाखवली.

याआधी शोएबनं अफगाणिस्तानच्या संघावर जहरी टीका केली होती. अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे आयडी पाहिले तर, संपूर्ण संघावर बंदी येईल. अफगाणिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं अगदी शेवटच्या षटकात तीन विकेटनं सामना जिंकला. त्यामुळं पाकिस्तानचे आव्हान कायम आहे. मात्र पाकिस्तानला चौथ्या क्रमांकासाठी अडथळा आहे तो बांगलादेश आणि इंग्लंड या दोन संघाचा.

त्यामुळं आज भारत- इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात जर भारतानं विजय मिळवला तर, पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांना त्याचा फायदा होईल तर, इंग्लंडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.

सध्या गुणतालिकेत, 14 गुणांसह ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. भारत 11 गुणांसह दुसऱ्या तर न्यूझीलंड 11 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने अफगाणस्तानवर विजय मिळवल्यामुळे ते 9 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. तर स्पर्धेत पहिल्यापासून दमदार कामगिरी करणारा इंग्लंड 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. बांगलादेश 7 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळं क्रिकेटच्या इतिहासात कदाचित प्रथमत 130 कोटी भारतीयांसोबत 20 कोटी पाकिस्तानी आणि 15 कोटी बांगलादेशी विराटसेनेच्या विजयासाठी प्रार्थना करतील.

Loading...

वाचा- World Cup:क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एका सामन्यावर 165 कोटी लोकांची नजर!

वाचा- World Cup: भारत सेमीफायनलमध्ये जाणार की इंग्लंड इतिहास बदलणार!

वाचा- World Cup: पाकच्या विजयानंतर मैदानात चाहत्यांचा राडा; खेळाडूंनाही सोडलं नाही!

ब्रेकअपचा बदला, प्रेयसीवर केले 12 वार आणि स्वत:चाही चिरला गळा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2019 01:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...