World Cup : शोएब अख्तरचा भारतावर गंभीर आरोप!

वादग्रस्त आहे पण तुम्हाला सहन करावं लागेल असं सांगत अख्तरने अफगाणिस्तानच्या संघावर बंदी येईल असं म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 03:52 PM IST

World Cup : शोएब अख्तरचा भारतावर गंभीर आरोप!

लीडस्, 29 जून : पाकिस्तानच्या संघाला अफगाणिस्तानविरुद्ध विजय आवश्यक आहे. या सामन्याच्या निकालावर त्यांचा वर्ल्ड कपमधील पुढचा प्रवास ठरणार आहे. त्यांचे दोन सामने उरले असून त्यात विजय मिळवावाच लागेल. अफगाणिस्तानने आतापर्यंत एकही विजय मिळवला नसला तरी त्यांनी बलाढ्य संघांना झुंजवलं आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं भारतावरसुद्धा टीका केली आहे. भारताने अफगाणिस्तानला प्रशिक्षण देताना फलंदाजीत कच्चं सोडलं असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नाही तर अफगाणिस्तानच्या संघावर बंदी येईल असंही त्याने म्हटलं.

शोएब अख्तर म्हणाला की, अफगाणिस्तानचे खेळाडू कधीकाळी पेशावर, रावळपिंडी शिकत होते. आम्ही त्यांना शिकवत होतो पण आता दिल्ली आणि नोएडात शिकतात. भारताने त्यांच्यावर खूप पैसा खर्च केला पण अफगाणिस्तानच्या फंलदाजीत सुधारणा करू शकले नाहीत.

शोएब अख्तर म्हणाला की जर अफगाणिस्तानच्या संघातील खेळाडूंचे ओळखपत्र काढले तर त्यांच्यावर बंदी येईल. अफगाण क्रिकेट बोर्डाच्या सीईओसह सर्वांनाच अख्तरने सांगितलं की माध्यमात बोलताना जरा सांभाळून कारण तुमचे सर्व नातेवाईक पेशावर आणि कराचीतले निघतील. त्यामुळे संघावर बंदी येईल.

Loading...

आम्ही 30 लाख अफगाणिस्तानच्या लोकांना आमच्या घरात जागा दिली. ते आमच्या जवळचे आहेत पण सामन्यावेळी कोणतंही नातं, प्रेम नसेल कारण पाकिस्तानला दोन गुण हवे आहेत.

अफगाणिस्तान पहिल्यांदा पेशावर, रावळपिंडीत सराव करत होते. आता ते डेहराडूनला सराव करतात. त्याशिवाय बीसीसीआय त्यांना मदत करते.

पाहा 'मेन इन ब्ल्यू' कसे दिसतात भगव्या रंगात, PHOTO VIRAL

World Cup Point Table : लंकेच्या पराभवाने तीन संघांमध्ये चुरस!

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 03:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...