‘इंग्लंडवर आमचं सर्जिकल स्ट्राईक’, नेहमी पाकवर तोंडसुख घेणाऱ्या शोएब अख्तरचा नवा VIDEO व्हायरल

‘इंग्लंडवर आमचं सर्जिकल स्ट्राईक’, नेहमी पाकवर तोंडसुख घेणाऱ्या शोएब अख्तरचा नवा VIDEO व्हायरल

याआधी वेस्ट इंडिज विरोधात पराभव मिळवल्यानंतर याच शोएब अख्तरनं पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराजवर जहरी टीका केली होती.

  • Share this:

लंडन, 04 मे : सलग 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर अखेर पाकिस्तानच्या संघानं इंग्लंड विरोधात झालेल्या सामन्यात विजय मिळवला. यजमानांना 14 धावांनी धुळ चारत वर्ल्ड कपमधला आपला विजय तर नोंदवला सोबतच इंग्लंडला जबर धक्काही दिला. दरम्यान पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून लाजीरवाणा पराभव स्विकारल्यानंतर पाकिस्तानच्या संघावर आणि कर्णधार सर्फराज यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्या शोएब अख्तरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंग्लंडवर पाकिस्तानच्या संघाने सर्जिकल स्ट्राईक केल्याचे या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे. मात्र, या व्हिडिओवरुन भारतीय चाहत्यांनी शोएबची चांगलीच शाळा घेतली आहे. कारण पाकिस्ताननं भारतावर एकदाही विजय मिळवलेला नाही.

सोमवारी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या हाफिजन इंग्लंडच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले. 85 धावांची तुफानी खेळी करत इंग्लंडसमोर 349 धावांचे आव्हान ठेवले. दरम्यान आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणारा संघ म्हणून ओळख असलेल्या यजमानांना हे आव्हान पार करता आले नाही. इंग्लंडकडून जो रूट आणि जोस बटलर यांनी शतकी खेळी केली, मात्र इंग्लंडला सामना जिंकता आला नाही. पाकिस्तानने 14 धावांनी विजय मिळवून वर्ल़्डकप आधी झालेल्या मालिकेतील पराभवाचा बदला घेतला.

या सामन्यानंतर अख्तरनं, “ आजच्या सामन्यात काहीच अघटीत नव्हते. आमचा कर्णधार जागा झाला आहे. पाकिस्तानं आपल्या ताकदीच्या जोरावर हा सामना जिंकला आहे. मी आधीच म्हणालो होतो, पाकिस्तानचा संघ इंग्लंडवर सर्जिकल स्ट्राईक करेल, आणि तसेच झाले. याआधी शोएबनं सर्फराजवर टीका केली होती.

अख्तरनं सर्फराज अनफिट आहे, ज्याचं तोंड मोठं आहे, ज्याचं पोठं मोठ आहे. तो कसा कर्णधार झाला असा सवालही करत टीका केली होती. आता मात्र पाकिस्तानच्या विजयानंतर त्यानं सर्फराज आणि पाकिस्तान संघाचे कौतुक केले आहे. पाकिस्तानचा पुढचा सामना श्रीलंकेविरोधात होणार आहे. तर, वर्ल्ड कपमधला सर्वात हायवोल्टेज सामना भारत विरुद्ध पाकिस्तान 16 जून रोजी होणार आहे.

वाचा-World Cup : विराटसेनेची कमाल! एकही सामना न खेळता पोहचला 7व्या क्रमांकावर, 'हे' आहे कारण

वाचा- भारतीय क्रिकेटपटूची डोपिंग चाचणी, वर्ल्ड कपमधला 'असा' एकमेव खेळाडू

वाचा- 'त्या' फोन कॉलमुळे वर्ल्ड चॅम्पियन संघात खेळू शकला सचिन

वाचा-World Cup : बेअरस्टोच्या तडाख्याने बदलला आकार, पंचांना मागवावा लागला नवा चेंडू

VIDEO: धक्कादायक! कुलगाम परिसरात जवानांच्या गाडीर तुफान दगडफेक

First published: June 4, 2019, 8:18 AM IST

ताज्या बातम्या