World Cup : आधी कोहलीसारखं खेळायला शिका, शोएबनं पुन्हा घेतली पाक खेळाडूंची शाळा

नेहमीच पाक संघावर टीका करणाऱ्या शोएबनं पुन्हा एकदा पाकिस्तानी खेळाडूंची शाळा घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 06:29 PM IST

World Cup : आधी कोहलीसारखं खेळायला शिका, शोएबनं पुन्हा घेतली पाक खेळाडूंची शाळा

लंडन, 24 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील झालेल्या सामन्यानंतर पाक खेळाडूंवर सर्वांनी टीका केली. यातच पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं सर्व पाक खेळाडूंची शाळा घेतली. सोमवारी बाबर आजमनं विराट कोहली आपला आदर्श खेळाडू असल्याचे वक्तव्य केले होते. यावर शोएबनं बाबरची शाळा घेतली. आजम हा पाकिस्तानकरिता महत्त्वाचा खेळाडू आहे, दक्षिण आफ्रिकेविरोधात त्यानं चांगली खेळही केली, मात्र विराट कोहलीसारखा तो फिनिशर नाही असे अख्तर म्हणाला.

शोएबनं आपल्या युट्युब चॅनलवर टाकलेल्या व्हिडिओमधून त्यानं बाबरवर टीका केली. "मी बाबर आझमला सांगू इच्छितो की, जर विराट कोहली तुझा आदर्श आहे तर त्याच्या सारखा खेळायला शिक. विराट संघ अडचणीत असताना धावा करतो. विराटसारख्या धावा काढणं, सर्वांना जमत नाही", असे आपल्या व्हिडिओमधून सांगितले.

कोहली, रोहित आणि विल्यम्सन सारख्या खेळाडूंचा खेळ पाहावा

अख्तरनं आपल्या व्हिडिओमध्ये, "विराट, रोहित आणि केन विल्यम्सन या खेळाडूंची फलंदाजी पाहिली तर ते आपल्या अर्धशतकानंतर त्यांनी धावा करण्याची गती वाढते. आझमनं या खेळाडूंकडे शिकले पाहिजे", असे मत व्यक्त केले.

Loading...

पाकचा कमबॅक

पाकिस्तानने भारताविरुद्धच्या पराभवातून सावरत जोरदार कमबॅक केलं आहे. लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानना 50 षटकांत 308 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 259 धावांत रोखलं. या विजयानंतर पाकिस्तानच्या सेमीफायनलला पोहचण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाकिस्तानच्या विजयाने यजमान इंग्लंडच्या पुढच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

वाचा- आता जगाला मिळाला दुसरा धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचा खळबळजनक दावा

वाचा- World Cup : कोण आहे ही हॉट अ‍ॅंकर, सचिनसोबतचा सेल्फी झाला VIRAL

वाचा-ऑन फिल्ड हिटमॅन तर ऑफ फिल्ड दम्शराज किंग, VIDEO VIRAL

' पिवळी साडीवाली' अधिकारी महिलेच्या डान्सचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 06:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...