'धवन तू लवकर बरा होशील', सचिनचे भावनिक ट्वीट तर मोदी म्हणाले...

ICC Cricket World Cup 2019 : भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचं बीसीसीआयने बुधवारी स्पष्ट केलं.

News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2019 07:28 PM IST

'धवन तू लवकर बरा होशील', सचिनचे भावनिक ट्वीट तर मोदी म्हणाले...

मुंबई, 20 जून : इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरु असतानाच भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावं लागलं. धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली होती. तेव्हा त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. या दुखापतीतून सावरण्यास किमान महिना लागेल अशी माहिती मिळाल्यानंतर बीसीसीआयने बुधवारी संध्याकाळी धवन खेळू शकणार नाही असं स्पष्ट केलं. शिखर धवनच्या जागी रिषभ पंतला संघात स्थान मिळालं आहे. वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेतून बाहेर पडल्याचं दु:ख आहे पण खेळ सुरू राहिला पाहिजे म्हणत धवनने चाहत्यांचे आभार मानले. आता धवनचं वर्ल्ड कप स्पर्धेला मुकण्याचं दुखं मी समजू शकतो असं म्हणत भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने धवनला धीर देणारं ट्विट केलं आहे.

सचिनने म्हटलं आहे की, तुझं दु:ख मी समजू शकतो. तू चांगला खेळलास आणि महत्त्वाच्या स्पर्धेत तुझं दुखापतग्रस्तन होणं क्लेशदायक आहे. मला खात्री आहे तू लवकरच जोमाने कमबॅक करशील. शिखर धवनच्या जागी संघात समावेश झालेल्या रिषभ पंतला सचिन तेंडुलकरने शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेत तुला तुझा खेळ दाखवण्याची संधी आहे असंही ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा शिखर धवनच्या दुखापतीनंतर ट्विट केलं आहे. आम्हाला या स्पर्धेत नक्कीच तुझी उणीव भासेल. तू लवकर बरा होशील आणि देशाच्या विजयात मोलाची वाटा उचलशील अशी आशा असल्याचं पंतप्र्धान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

Loading...

धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यावेळी अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी रिषभ पंतला इंग्लंडला बोलावण्यात आलं होतं. धवन किमान शेवटच्या काही सामन्यात खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्याची दुखापत जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत बरी होण्याची शक्यता कमी असल्याने तो संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे.

World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

VIDEO : नववधूला घेऊन पती गेला दर्शनला, पण ती प्रियकरासोबत पळाली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2019 07:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...