World Cup : हम हौसलों सें उडते है...दुखापतीनंतर धवनची भावनिक पोस्ट व्हायरल

World Cup : हम हौसलों सें उडते है...दुखापतीनंतर धवनची भावनिक पोस्ट व्हायरल

धवन 10-12 दिवसांमध्ये फिट होईल अशी माहिती भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी दिली आहे.

  • Share this:

ट्रेंट ब्रिज, 12 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतानं आपली विजयी घौडदौड सुरु केली. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला धुळ चारल्यानंतर विराटसेनेचं लक्ष्य आता न्यूझीलंडचा संघ आहे. मात्र, या सामन्याआधी भारताला मोठा धक्का बसला. भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन याच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळं तीन आठवडे तो महत्त्वाच्या सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळं धवन ऐवजी कोणाला संधी मिळावी, याची चर्चा सध्या रंगली आहे. असे सगळे असताना, आता सलामीवीर शिखर धवन लवकरच फिट होण्याच्या मार्गावर आहे.

दरम्यान बीसीसीआय शिखरवर इंग्लंडमध्ये उपचार करणार आहे. गुरुवारी भारतीय संघ न्युझीलंड विरोधात खेळणार आहे. मात्र, या सामन्यात धवन खेळू शकणार नाही आहे. असे असले तरी, सरावासाठी धवन मैदानात दिसला. त्यामुळं तो लवकरच फिट होऊ शकतो, अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

दुखापतीनंतर शिखरनं आज पहिल्यांदाच भावनिक ट्विट करत, आपल्याला काय वाटते आहे ते सांगितले. धवननं, “कभी महक की तरह हम गुलों से उड़ते हैं, कभी धुएं की तरह पर्वतों से उड़ते हैं.. ये कैेचियाँ हमें उड़ने से खाक रोकेंगी, कि हम परों से नहीं हौसलों से उड़ते हैं...” ही शायरी पोस्ट केली. धवन तीन आठवडे खेळू शकत नसला तरी तो इंग्लंड विरोधात सामना खेळताना दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

10 दिवसांत होणार फिट

दुसरीकडे, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याआधी झालेल्या मुलाखतीत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आले होते. यावेळी बांगर यांनी," आम्ही धवनच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत. धवनच्या दुखापत लवकर बरी होईल, अशी आम्हाला आशा आहे. धवन 10-12 दिवसांमध्ये फिट होईल, असे आम्हाला वाटते. रिषभ पंत मँचेस्टर येथे काही वेळात दाखल होणार आहे.", अशी माहिती दिली.

शिखर धवन इंग्लंड विरोधात करणार कमबॅक

मेडिकल रिपोर्टनुसार शिखर धवन इंग्लंड विरोधात होणाऱ्या सामन्यात कमबॅक करु शकतो. भारत आणि इंग्लंड यांच्यात 30 जून रोजी सामना होणार आहे. त्याआधी भारत 22 जून रोजी अफगाणिस्तान विरोधात खेळेल, या सामन्यातही शिखर खेळू शकतो. मात्र इंग्लंडविरोधात भारताला त्याची जास्त गरज असेल.

असा झाला होता धवन जखमी

ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात फलंदाजी करत असताना शिखर धवनच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. जलद गोलंदाज कुल्टर नाईलचा चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला होता.त्यामुळं त्याला दुसऱ्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करता आले नाही. याच सामन्यात धवननं 117 धावांची खेळी केली होती. त्यामुळं धवनची कमी विराटला जाणवणार आहे.

वाचा- ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा

वाचा- World Cup : सलामीला केएल राहुल तर धवनच्या जागी 'हा' खेळाडू मिळवून देणार विजय?

वाचा- वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का

SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?

First published: June 12, 2019, 7:26 PM IST

ताज्या बातम्या