World Cup : क्रिकेटच्या मैदानावर द्यायचा सुरक्षा, आता बाऊंसरनं करतो फलंदाजांची शिकार

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी आपल्या शॉट बॉलनं कांगारुंना सळो की पळो करुन सोडले.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 07:19 PM IST

World Cup : क्रिकेटच्या मैदानावर द्यायचा सुरक्षा, आता बाऊंसरनं करतो फलंदाजांची शिकार

ICC World Cup मध्ये वेस्ट इंडिजचा संघ हा अंडरडॉग संघ ठरेल, असे मत सर्वच चाहत्यांनी व्यक्त केले आहे. आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधात झालेला सामनाही त्यांनी अटीतटीचा केला. पण ऑस्ट्रेलियाच्या संघानं हा सामना केवळ 15 धावांनी जिंकला. यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी आपल्या शॉट बॉलनं कांगारुंना सळो की पळो करुन सोडले. यात महत्त्वाची भूमिका बजावली ती वेस्ट इंडिजचा गोलंदाज शेल्डन कॉटरेल यानं. कॉटलरनं ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात मॅक्सवेल आणि डेव्हिड वॉर्नर या दोन मोठ्या विकेट घेतल्या.

शेल्डन कॉटरेल विकेट घेतल्यानंतर लष्कराच्या जवानांप्रमाणे सेलिब्रेट करताना दिसले. त्याच्या सल्यूट स्टाईलची चर्चा वर्ल्ड कपमध्ये रंगतेय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधीही समालोचकांनी त्याच्या स्टाईलमध्ये सगळ्यांचे स्वागत केले.

Loading...

कॉटरलच्या या स्टाईलमागचे मुख्य कारण म्हणजे, तो स्वत: काही वर्ष सुरक्षादलात होता. 2011मध्ये वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात झालेल्या सामन्यात मैदानावर सुरक्षा देण्याच काम कॉटरल करत होता.

दरम्यान 2013 साली कॉटरलनं वेस्ट इंडिजकरिता क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्यानं पदार्पण केले होते. मात्र, चांगले प्रदर्शन करु न शकल्यामुळं त्याला संघातून बाहेर काढण्यात आले.

कॉटरल सध्याच्या वर्ल्ड कप संघात वेस्ट इंडिजकडून कमबॅक करत आहे. त्याच्या गोलंदाजीमुळं प्रतिस्पर्धी संघाच्या टॉप ऑर्डरला त्रास होणार आहे. दरम्यान क्रिकेटच्या मैदानाबाहेरही कॉटरल लष्कराच्या पेहराव्यात पाहायला मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...