World Cup : शाकिबचा विक्रम, सचिन-हेडन यांच्यानंतर ठरला तिसरा क्रिकेटपटू!

ICC Cricket World Cup : बांगलादेशच्या शाकिब अल हसनने एकाच सामन्यात सचिनच्या 2 विक्रमांशी बरोबरी केली. यातही तो सचिन आणि हेडन यांच्यापेक्षा वरचढ ठरला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 12:51 PM IST

World Cup : शाकिबचा विक्रम, सचिन-हेडन यांच्यानंतर ठरला तिसरा क्रिकेटपटू!

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने शेवटच्या सामन्यात आपल्या खेळीनं भारताचा मास्टर ब्लास्टरच्या विक्रमांशी बरोबरी केली.

शाकिबने पाकिस्तानविरुद्ध 62 चेंडूत 5 चौकारांसह अर्धशतक केलं. त्याने या वर्ल्ड कपमध्ये पाच अर्धशतकं केली. तर एकूण सात वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या.

शाकिबने सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनने 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये 7 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. सचिने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये 11 डावात 7 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. तर शाकिबने फक्त 8 सामन्यात केली ही कमाल. इतर फलंदाजांमध्ये कोणालाही 50 पेक्षा जास्त धावा इतक्या वेळा करता आलेल्या नाहीत.

पाकिस्तानविरुद्ध शाकिबने 60 धावा करताच 600 चा आकडा पार केला. अशी कामगिरी करणारा 2019 च्या वर्ल्ड कपमधील तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. वर्ल्ड कप इतिहासात सचिन आणि मॅथ्यू हेडननंतर 600 पेक्षा जास्त धावा करणारा तिसरा फलंदाज शाकिब अल हसन आहे.

सचिन तेंडुलकरने 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये 11 सामन्यात 673 धावा केल्या होत्या. आतापर्यंत हा विक्रम अबाधित आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये 11 सामन्यात 659 धावा केल्या होत्या. तर शाकिबने मात्र केवळ 8 सामन्यात 2 शतके आणि 5 अर्धशतकांसह 606 धावा केल्या. त्याने फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही कमाल करत 11 विकेट घेतल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 12:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...