लंडन, 03 जून : बांगलादेशनं जायंट किलर बनत रविवारी झालेल्या सामन्यात साऊथ आफ्रिकेच्या संघाला 21 धावांनी पराभूत केलं. यावेळी बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेच्या संघाची तारांबळ उडाली. हाशिम अमलाच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या एडन मार्कराम आणि क्विंटन डी'कॉक यांनी चांगला खेळ केला. पण, शाकिब अल हसनच्या भेदक माऱ्या पुढे साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही.
बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार यांनी दमदार फलंदाजी केली. त्यानंतर अनुभवी शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची विक्रमी भागीदारी केली. एकदिवसीय क्रिकेटमधील बांगलादेशची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. मात्र या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधले ते शकिब अल हसन याने. गोलंदाजी करताना त्यानं एकदिवसीय क्रिकेटमधला आपला 250वा बळी घेतला. त्याचबरोबर शाकिबने सनथ जयसूर्या, शाहिद आफ्रिदी, जॅक कॅलिस आणि अब्दुल रझाक यांच्या पंक्तितही स्थान पटकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 बळी आणि 5 हजार धावा करणारा तो पाचवा अष्टपैलू खेळाडू ठरला. त्यानं 199 सामन्यांत हा पराक्रम केला आणि ही अष्टपैलू खेळाडूची सर्वात जलद कामगिरी आहे. शिवाय बांगलादेशकडून 250 विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे.
Fewest ODIs to score 5000 runs and take 250 wickets:
बांगलादेशने याआधी 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. तेव्हा त्यांनी आफ्रिकेवर 67 धावांनी विजय मिळवला होता. त्या संघातील चार खेळाडू आजच्या सामन्यात होते. कर्णधार मोर्तझा, यष्टीरक्षक रहिम, तमिम इक्बाल आणि शाकिब अल हसन हे चौघे 2007 च्या वर्ल्ड कप संघात होते.
BOWLED HIM! @Sah75official gives the breakthrough, Markram gone for 45. South Africa are 102/2. Target 331.