लंडन, 20 जून : पाचवेळा जग्गजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना बांगलादेशी टायगर्सशी होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा फक्त भारताने पराभव केला आहे. तर बांगलादेशनं वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धक्कादायक विजयांची नोंद केली आहे. बांगलादेश 5 गुणांसह सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशच्या संघाची कामगिरी जरी दिसण्यासारखी नसली तरी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने यंदाचा वर्ल्ड कप गाजवला आहे. मॉर्गन, रूट किंवा अॅरॉन फिंच यांनाही शाकिब अल हसनने मागं टाकलं आहे. पहिल्या सामन्यापासून त्याने वर्ल्ड कपमध्ये खेळात सातत्य ठेवलं आहे. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या या खेळाडूने आतापर्यंत वर्ल्ड कपमधील सर्वात जास्त धावा केल्या आहेत. शाकिब 384 धावांसह पहिल्या स्थानावर आहे तर जो रूट 367 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.
बांगलादेशच्या या अष्टपैलू खेळाडूने यंदाच्या स्पर्धेत 2 शतके आणि दोन अर्धशतके केली आहेत. सर्वाधिक शतकांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहेत तर अर्धशतके करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथने 3 अर्धशतके केली आहेत.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने धावांचा पाऊस पाडला. यावेळी त्याने षटकारांची आतषबाजीसुद्धा केली. स्पर्धेत सर्वाधिक 22 षटकार मॉर्गनच्या नावावर आहेत. त्या तुलनेत शाकिबने केवळ दोनच षटकार मारले आहेत. चौकार मात्र शाकिब अल हसनच्या नावावर आहेत. त्याने आतापर्यंत स्पर्धेत तब्बल 43 चौकार मारले आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूने 32 चौकार मारले आहेत.
Shakib Al Hasan is now the leading run-scorer at #CWC19 👀 #WIvBAN pic.twitter.com/vrbiQTvOF6
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 17, 2019
फलंदाजी करताना सरासरीच्या बाबतीत शाकिब अल हसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या केन विल्यम्सन 195 च्या सरासरीने तर हिटमॅन रोहित शर्माने 159 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. शाकिबने 128 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
Congratulations to @Sah75official for becoming the fastest player to score 6000 runs and take 250 wickets in ODIs (202 Matches).#RiseOfTheTigers #KhelbeTigerJitbeTiger pic.twitter.com/F2e4DgXP4i
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 18, 2019
फलंदाजीशिवाय त्याने गोलंदाजीतही कमाल केली आहे. चार सामन्यात पाच गडी बाद केले आहेत. बांगलादेशकडून सर्वाधिक विकेट मोहम्मद सैफुद्दीनने 9 आणि त्यानंतर मुस्तफिझुर रहमानने 7 विकेट घेतल्या आहेत. बांगलादेशकडून यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये शाकिब अल हसन कमी धावा देणारा खेळाडू आहे. त्याने 5.84 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत.
वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...
वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव
वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया
VIDEO : ...तर लाज का वाटते, उद्धव ठाकरेंचा ओवेसींवर हल्लाबोल