World Cup: धोनीच बाद होणं लागलं जिव्हारी, चाहत्याचा झाला मृत्यू!

World Cup: धोनीच बाद होणं लागलं जिव्हारी, चाहत्याचा झाला मृत्यू!

वर्ल्ड सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनीचे हे बाद होणं एका चाहत्यासाठी इतका धक्का देणारे ठरले की त्याचा मृत्यू झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जुलै: ICC Cricket World Cupमधील भारतीय संघाचा सेमीफायनलमधील पराभव संपूर्ण क्रिकेटविश्वासाठी धक्कादायक होता. न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताच्या शंभर धावा तरी होतील का अशी शंका वाटत असताना रविंद्र जडेजा आणि एम.एस.धोनी यांनी शानदार खेळी करत भारताच्या आशा उंचवल्या होत्या. सातव्या विकेटसाठी जडेजा-धोनी यांनी शतकी भागिदारी केली. विजयाचे लक्ष्य गाठताना भारताला पहिला जडेजा बाद झाल्याने धक्का बसला त्यानंतर सर्वांच्या नजरा धोनीवर होत्या. पण धोनी धावबाद झाला आणि भारताचा पराभव निश्चित झाला. धोनी बाद झाल्यानंतर मैदानात एक शांतता पसरली. धोनीचे हे बाद होणं एका चाहत्यासाठी इतका धक्का देणारे ठरले की त्याचा मृत्यू झाला.

WORLD CUP : टीम इंडियाने सामना हरला पण तरीही भारतच चॅम्पियन!

भारत-न्यूझीलंड यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या 11 चेंडूत भारताला 25 धावांची गरज होती. 49व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर धाव घेता आली नाही. अखेर तिसऱ्या चेंडूवर धोनीने एक धाव घेतली दुसऱी धाव घेण्याचा प्रयत्न करताना धोनी धावबाद झाला. धोनी बाद झाल्याने टीम इंडियाचे आणि कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले. कोलकाता येथील एका सायकल दुकाना श्रीकांत मैती हा सामना पाहत होते. धोनी बाद झाल्याचा धक्का श्रीकांत यांना सहन झाला नाही आणि दुकानातच त्यांचा मृत्यू झाला. श्रीकांत दुकानात त्यांच्या मोबाईलवर सामना बाहत होते. धोनीची विकेट गेल्यानंतर त्यांना झटका बसला आणि त्यांचा श्वास रोखला गेला.

World Cup: सेमीफायनलमधील पराभवानंतर टीम इंडियातील दोघांनी दिले राजीनामे!

श्रीकांत यांच्या शेजारी असलेल्या मिठाईच्या दुकानाचे मालक सचिन घोष यांना मोठा आवाज आल्याने ते धावत आले. घोष दुकानात पोहोचले तेव्हा श्रीकांत जमिनीवर कोसळले होते. घोष यांनी तातडीने श्रीकांत यांना रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Loading...

World Cupमधील मँचेस्टर येथे झालेल्या सेमीफायनल लढतीत न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. साखळी फेरीत सर्वोत्तम कामगिरी करत गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले होते. त्यामुळे भारतीय संघ विजेतेपदाचा मुख्य दावेदार होता.

VIDEO: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...