World Cup : फायनलआधी इंग्लंडला धक्का, मुख्य खेळाडूवर आयसीसी घालणार बंदी?

World Cup : फायनलआधी इंग्लंडला धक्का, मुख्य खेळाडूवर आयसीसी घालणार बंदी?

दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात जेसॉन रॉयनं 65 चेंडूंत 85 धावा केल्या.

  • Share this:

बर्मिंगहॅम, 12 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवत इंग्लंडनं 1992नंतर फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 224 धावांवर अडवले. दरम्यान हे आव्हान इंग्लंडने 32.1 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. 1992नंतर इंग्लंड प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. रविवारी इंग्लंडचा अंतिम सामना न्यूझीलंड विरोधात होणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी इंग्ंलडला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या मुख्य खेळाडूवर आयसीसीकडून बंदी घातली जाऊ शकते.

दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात जेसॉन रॉयनं 65 चेंडूंत 85 धावा केल्या. मात्र, या सामन्यात इंग्लंडचा सलामीवर रॉयनं पंचांशी हुज्जत घालून स्वतःवर संकट ओढावून घेतले आहे. त्यामुळं रॉयला आयसीसीनं शिक्षा सुनावली आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयनं सलामीवीर जॉनी बेअरस्टो यांच्यासह 124 धावांची भागीदारी केली.

जेसन रॉयला होणार सामना बंदीची शिक्षा?

जेसॉन रॉय 85 धावांवर खेळत असताना, 20 व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रॉयला चुकीच्या पद्धतीनं बाद देण्यात आले. बॅट आणि चेंडू यांच्यात काहीच संपर्क झाला नाही, तरीही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अपील केले, त्यानंतर, पंच कुमार धर्मसेनानं त्याला बाद ठरवले. त्यानंतर रॉयनं तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली. या प्रकरणी आयसीसीनं रॉयला शिक्षा सुनावली आहे. दरम्यान रॉयला सामना बंदी नाही तर मानधनातील 30 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

वाचा- IPLचा 'हा' नियम वर्ल्ड कपमध्ये का नाही? विराटचा ICCला सवाल

वाचा- World Cup : विराट नाही तर वर्ल्ड कपनंतर रोहितकडे असणार कर्णधारपद?

वाचा- World Cup : हिटमॅनची एक धाव, फायनलमध्ये दोन फलंदाजांना शतकाची गरज!

VIDEO: जगबुडीचं रौद्र रूप! मुसळधार पावसामुळे नदीनं ओलांडली धोक्याची पातळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 02:21 PM IST

ताज्या बातम्या