World Cup : धोनीवरून गांगुली आणि सचिनमध्ये मतभेद, ट्रोलर्सवरही साधला निशाणा

World Cup : धोनीवरून गांगुली आणि सचिनमध्ये मतभेद, ट्रोलर्सवरही साधला निशाणा

याआधी धोनी आणि केदारच्या संथ खेळीवर सचिननं टीका केली होती. त्यानंतर चाहत्यांमध्ये ट्विटर वॉरही झाले होते.

  • Share this:

लंडन, 26 मे : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत एकही सामना त्यांनी गमावलेला नाही, मात्र असे असले तरी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या टीकेचा धनी झाला आहे. अफगाणिस्तान विरोधात धोनीनं धिम्या गतीनं फलंदाजी केली होती, यावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरसह चाहत्यांनीही त्यावर टीका केली होती. धोनीनं अफगाणिस्तान विरोधात 50 चेंडूत केवळ 28 धावा केल्या होत्या, त्यामुळं भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आता या सर्व प्रकरणावर भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने सुध्दा आपले मत व्यक्त केले आहे.

अफगाणिस्तानविरुद्द भारताची आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. भारताच्या चार बाद 135 धावा झाल्या होत्या. त्यावेळी 20 ओव्हर बाकी होत्या. त्यानंतर भारताला फक्त 89 धावा करता आल्या. यामध्ये धोनी सर्वात जास्त वेळ मैदानात होता. यात वेगाने धावा न होण्यामागे केदार जाधव आणि धोनी यांची संथ खेळी होती. यावर सचिननं, "धोनीसारख्या वरिष्ठ खेळाडूने त्यावेळी नेतृत्व करायला हवे होते. जाधवच्या वाट्याला या मालिकेत जास्त वेळा फलंदाजी करण्याची संधी आली नाही. त्यामुळे धोनीने फटकेबाजीसाठी पुढाकार घ्यायला हवा होता", असे मत व्यक्त केले होते. धोनी आणि केदार जाधव यांना चांगल्या सरासरीने फटकेबाजी करता आली नाही,असे म्हणत फटकावले. मात्र, सचिनच्या या टीकेनंतर धोनी चाहत्यांनी सचिनलाच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. धोनीच्या चाहत्याने, "धोनी हा श्रेष्ठ फलंदाज असून सचिन सारखा तो स्वत:साठी कधीच खेळला नाही अशी टीका केली होती.

गांगुलीनं केले धोनीचे समर्थन

सचिननं केल्या टीकेनंतर गांगुलीनं मात्र धोनीची बाजू घेतली आहे. दादानं, "धोनी हा सर्वात चांगला फलंदाज आहे, तो शानदार कमबॅक करेल, त्यामुळं त्यांची चिंता करु नका", असे सांगत धोनीचे समर्थन केले. धोनीनं 2019मध्ये 50हून अधिकच्या सरासरीनं धावा केल्या आहेत. 12 सामन्यात त्यानं 417 धावा केल्या आहेत. ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, त्याचा स्ट्राईक रेटहा 78.38 आहे, जो त्याच्या कारकीर्दीतला सर्वात कमी आहे.

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

First published: June 26, 2019, 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading