PAK vs NZ : सर्फराजनं केली टिकाकारांची बोलती बंद, घेतला अफलातून कॅच

भारताविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर पाकनं चांगला कमबॅक केला. मात्र सेमिफायनल गाठण्यासाठी त्यांना सर्व सामने जिंकण्याची गरज आहेच, त्याचबरोबर इतर संघांकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे.

भारताविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर पाकनं चांगला कमबॅक केला. मात्र सेमिफायनल गाठण्यासाठी त्यांना सर्व सामने जिंकण्याची गरज आहेच, त्याचबरोबर इतर संघांकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे.

  • Share this:
    बर्मिंगहम, 26 जून: ICC Cricket World Cupमध्ये आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होत आहे. दरम्यान या सामन्यात न्यूझीलंडनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय किंवींना महागात पडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पाकच्या गोलंदाजांनी किवींच्या फलंदाजांवर वर्चस्व कायम राखत त्यांना आक्रमक फलंदाजी करू दिली नाही. दुसऱ्याच ओव्हरला मोहम्मह आमिरनं न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज मार्टिन गुपतीलला बाद केले. आमिरच्या गोलंदाजीवर फटका खेळताना चेंडू बॅटला लागून बेल्सवर आदळला आणि गुपतील केवळ 5 धावांवर माघारी परतला. त्या पाठोपाठ कॉलिन मुनरोदेखील 12 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर हे दोन 2 अनुभवी खेळाडू डाव सांभाळतील अशी आशा न्यूझीलंडला होती. पण तेव्हाच रॉस टेलरच्या उत्कृष्ट झेल टिपत सर्फराजने टेलरला तंबूत धाडले. वर्ल्ड कपमध्ये सध्या पाकिस्तानच्या संघासाठी करो या मरोचा सामना आहे. त्यांना आपले उर्वरित सामने जिंकावे लागणार आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध विजय त्यांना आवश्यक आहे. त्या दृष्टीने पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंड विरुद्ध दमदार करत आहेत. त्यातच विकेटकिपर-कर्णधार सर्फराज अहमदनं भन्नाट कॅच घेत आपल्या संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. त्याचबरोबर त्याच्यावर टीका करणाऱ्यांची त्याने बोलती बंद केली आहे. याआधी सर्फराजवर तो जाडा असल्यामुळं टिका करण्यात आली होती. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांनेही सर्फराजे पोट पुढे आहे, तो फिट नाही आहे, अशी टिका केली होती. तर, भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पराभव स्विकारल्यानंतर सर्फराजचा एका चाहत्यानं मॉलमध्ये गाठून, तु वजन कमी करा असे सांगितले होते. त्यानंतर आज सर्फराजनं घेतलेल्या या अप्रतिम झेलवर त्याचे कौतुक केले जात आहे. पाकच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून न्यूझीलंडवर आपले वर्चस्व ठेवले. नवव्या षटकात शाहिद आफ्रिदीने आऊट स्विंग होणारा चेंडू टाकला. त्या चेंडूला दिशा देण्याच्या उद्देशाने टेलरने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि विकेटकिपर सर्फराजनं स्लिपच्या दिशेने चपळाईने उडी मारत कॅच पकडला. गेल्या काही सामन्यात टेलर आणि केन विल्यम्सन यांची जोडी कमाल करत आहे, त्यामुळं आफ्रिदीनं पाकला मोठे यश मिळवून दिले. दरम्यान भारताविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर पाकनं चांगला कमबॅक केला. मात्र सेमिफायनल गाठण्यासाठी त्यांना सर्व सामने जिंकण्याची गरज आहेच, त्याचबरोबर इतर संघांकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे. पाकिस्तानला हवी भारताची साथICC Cricket World Cupमध्ये पाकिस्तानला सेमिफायनलमध्ये पोहचण्यासाठी न्यूझीलंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याविरोधात सामने जिंकावे लागणार आहेत. तसेच, भारताच्या सामन्यांवरही त्यांची नजर असेल. भारताला श्रीलंका, बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्याविरोधात खेळायचे आहेत. जर, भारत इंग्लंड किंवा बांगलादेश यांच्याविरोधात सामन्यात पराभूत झाली तर, पाकिस्तानचा संघाचे सेमीफायनलचे स्वप्न धुळीस मिळेल. त्यामुळं पाकिस्तान चाहते आता भारतीय संघ सर्व सामने जिंकू देत अशी प्रार्थना करतील. वाचा- IND vs WI : अरे चाललयं काय, भारत वेस्ट इंडिज विरोधात खेळतचं नाहीये तर... वाचा- सचिनला भारतीय संघात नको आहे शमी, हॅट्ट्रिक करूनही नाकारण्याचे 'हे' आहे कारण वाचा- पाकचा माजी क्रिकेटर म्हणतो, 'भारत श्रीलंका, बांगलादेशविरुद्ध मुद्दाम हरणार' अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी
    First published: