World Cup : सानियानं काढला 'ती'च्यावर राग म्हणाली, 'मी पाकिस्तान संघाची आई नाही'

World Cup : सानियानं काढला 'ती'च्यावर राग म्हणाली, 'मी पाकिस्तान संघाची आई नाही'

पाकिस्तानच्या पराभवानंतर सानिया आणि वीणा मलिक यांच्यात रंगला ट्विटर वॉर

  • Share this:

मॅंचेस्टर, 18 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघानं पाकिस्तानच्या संघाला 89 धावांनी नमवतं, वर्ल्ड कपमधला इतिहास कायम ठेवला. पाकिस्तानला आतापर्यंत एकदाही भारताला नमवण्यात यश आलेले नाही. मात्र, पाकिस्ताननं सामना गमावल्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्याच्या आदल्या रात्री पाकिस्तानची टीम एका नाईट पार्टीत मश्गुल असल्याचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये टीमसोबत शोएब मलिकची पत्नी आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाही दिसते होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेट संघाची पुन्हा एकदा धुलाई केली.

मँचेस्टरच्या प्रसिद्ध शीशा नाईट क्लबमध्ये पाकिस्तानी खेळाडू आणि त्यांच्या पत्नीही गेल्या होत्या. तिथे त्यांनी मौज-मस्ती केली. काही पाकिस्तानी खेळाडू हुक्का पितानाही व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमच्यासोबत आमची मुलंही होती हे आमच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण आहे, असे मत व्यक्त केले होते.या सगळ्या प्रकरणात आता पाकिस्तानची मॉडेल वीणा मलिक हिनं उडी घेतली आहे. वीणानं, ''मला तुमच्यासोबत गेलेल्या मुलांची भीती वाटत आहे. तुम्ही शीशी नाईट क्लबमध्ये तुमच्या मुलांना घेऊन गेलात ? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ज्या क्लबमध्ये गेलात तिथं जंक फुड असतं, ते खेळाडूंसाठी योग्य आहे का? तु स्वत: एक आई आणि खेळाडू आहे, तुला हे माहित पाहिजे", असे ट्विट केले.यावर व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरुन भडकलेल्या सानियानं, वीणाला मी पाकिस्तान क्रिकेट संघाची आई नाही आहे, अशा शब्दात सुनावले. एवढचे नाही तर सानियानं आपल्या ट्विट करत, "वीणा, मी माझ्या मुलाला तिकडे घेऊन गेले नव्हते. मी माझ्या कुटुंबियांसोबत कुठे जायचं आणि कुठे नाही, हा निर्णय आमचा आहे. मला माझ्या मुलाची तुमच्या सर्वांपेक्षा जास्त काळजी आहे". त्यानंतर तिनं खोचकपणे, "मी पाकिस्तान क्रिकेट संघाची आई किंवा शिक्षिका नाही".असे सांगितेल. भारताविरुद्ध सामना हरल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी क्रिकेटपटूंवर जोरदार टीका केली.सर्फराज बिनडोक कर्णधार

पाकिस्तानच्या खेळाडूंच्या या सगळ्या स्थितीवर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर यानं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज खान याला जबाबदार ठरवले आहे. शोएरबनं आपल्या यु-ट्युब चॅनलवरुन भारत-पाकिस्तान सामन्यावर भाष्य केलं आहे. शोएबच्या मते पाकिस्ताननं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतले पाहिजे होता. त्यानं, भारतीय संघाविरोधात पाकिस्तानच्या संघानं एवढ्या वर्षात कधी आव्हानाचा पाठलाग करता आलेला नाही. त्यामुळं सफराजनं आपलं डोक चालवायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया दिली. शोएबनं या व्हिडिओमध्ये, "आमची मॅनेजमेंट पागल आहे आणि आमचा कर्णधार मामू बनला आहे. त्याला काही कळत नाही. तो म्हणजे 10वीच्या वर्गातला मुलगा आहे, त्याला बाकी जे सांगतील तेवढेचं तो करतो'', अशी जहरी टीका केली आहे.


VIDEO : रोहितने पाक टीमला दिला सल्ला, म्हणाला...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 08:20 AM IST

ताज्या बातम्या