World Cup : टीम इंडियाच्या जर्सीवरून राजकारण, 'नरेंद्र मोदींचा देशाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न'

World Cup : टीम इंडियाच्या जर्सीवरून राजकारण, 'नरेंद्र मोदींचा देशाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न'

टीम इंडियाच्या भगव्या रंगाच्या जर्सीवरुन समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे

मुंबई, 26 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ हा अपराजित संघ आहे. भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळं सेमिफायनल गाठण्यासाठी भारताला वेस्ट इंडिज विरोधात गुरुवारी होणारा सामना जिंकावा लागणार आहे. भारतानं आतापर्यंत 5 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले आहेत. तर, न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला. दरम्यान भारत आता बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्याविरोधात खेळणार आहे.

भारतीय संघाला इंग्लंड विरोधात खेळताना आपली निळ्या रंगाची जर्सी परिधान करता येणार नाही आहे. आयसीसीच्या नव्या नियमांनुसार दोन संघ एकाच रंगाची जर्सी परिधान करून खेळू शकत नाही, त्यामुळं भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. या जर्सीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान आता भारतीय संघाच्या जर्सीवरून देशभरात राजकारण सुरु आहे. यातच समाजवादी पार्टीचे अबू आजमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. आझमी यांनी, "वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं बदलला आहे. मोदी हे देशाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत" असा आरोप केला आहे. अबू आझमी यांच्या या आरोपावर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी, "भारतीय संघाच्या जर्सीवरून नाहक राजकारण सुरु आहे. आम्ही तिरंग्यात हिरवा रंग नको याविषयी कधी बोललो का?", असा संतप्त सवाल केला आहे.

बीसीसीआयनं निवडला जर्सीचा रंग

आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार, संघाच्या जर्सीचा रंग निवडण्याचा अधिकार हा बीसीसीआयकडे होता. बीसीसीआयला जो रंग योग्य वाटला त्यांनी तो दिला. भारतामध्ये ही भगव्या रंगाची जर्सी तयार करण्यात आली आहे.

काय आहे आयसीसीचा नियम

आयसीसीचे प्रत्येक संघाच्या जर्सीबाबत काही नियम आहेत. या नियमानुसार एकाच रंगाची जर्सी घालून दोन संघांना सामन्यात उतरता येत नाही. त्यासाठी एका संघाच्या जर्सीचा रंग बदलला जातो. फुटबॉलच्या सामन्यात या नियमाचा वापर केला जातो. त्याच धर्तीवर क्रिकेटमध्ये हा नियम आयसीसीने अवलंबला आहे. इंग्लंडविरुद्ध भारत आणि अफगाणिस्तानला जर्सीचा रंग बदलावा लागेल. यात इंग्लंडला त्यांच्याच जर्सीत खेळण्याची मुभा आहे. वर्ल्ड कपचे यजमानपद इंग्लंडकडे असून त्यांना आहे त्या जर्सीत खेळता येणार आहे.

इतर संघांनीही बदलले होते रंग

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशविरुद्ध जर्सीचा रंग एकसारखा असल्यानं पिवळ्या रंगाची जर्सी घातली होती. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या संघांना जर्सी बदलण्याची गरज नाही. त्यांच्या जर्सीसारखा रंग इतर कोणत्या देशाचा नाही.

वाचा- IND vs WI : अरे चाललयं काय, भारत वेस्ट इंडिज विरोधात खेळतचं नाहीये तर...

वाचा- सचिनला भारतीय संघात नको आहे शमी, हॅट्ट्रिक करूनही नाकारण्याचे 'हे' आहे कारण

वाचा- फलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या बुमराहच्या यॉर्कर मागचं 'हे' आहे रहस्य

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

First published: June 26, 2019, 5:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading