ICC World Cup : अवघ्या दोन मॅचमध्ये सचिननं घेतला युटर्न, धोनीबाबत केले 'हे' वक्तव्य

ICC World Cup : अवघ्या दोन मॅचमध्ये सचिननं घेतला युटर्न, धोनीबाबत केले 'हे' वक्तव्य

वर्ल्ड कपमध्ये आठ पैकी 7 सामन्यात भारताने चौथ्या क्रमांकावर चार खेळाडूंना खेळवलं आहे. तरी मधल्या फळीची चिंता कायम आहे.

  • Share this:

लंडन, 03 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असला तरी भारताला आपली फलंदाजी सुधारावी लागणार आहे. बांगलादेशविरुद्ध भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी 180 धावांची खेळी केली. रोहित शर्माने 104 तर केएल राहुलनं 77 धावांची खेळी करून भारताला भक्कम सुरूवात करून दिली. मात्र, त्यानंतरही भारताचा डाव गडगडला. 1 बाद 180 मध्ये 134 धावांची भर घालण्यासाठी भारताने 8 गडी गमावले. यात पंत, धोनी, कोहली वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. यामुळे पुन्हा भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनंतर मधल्या फळीत भरवशाचा फलंदाज कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान याआधी इंग्लंड आणि अफगाणिस्ताविरोधात धिमी फलंदाजी केल्यामुळं धोनीवर टीका करण्यात आली होती. यात महान फलंदाज सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. वर्ल्ड कपमध्ये भारत सर्वात बलाढ्य संघ समजला जात असला तरी काही कमकुवत बाजू आता समोर येत आहेत. त्यामध्ये अफगाणिस्तानसारख्या संघाने फलंदाजांची केलेली दमछाक. तसेच इंग्लंडसमोर धावांसाठी धडपडत असलेली मधली फळी बांगलादेशसमोर गारद झाली. पंत आणि धोनी वगळता इतर फलंदाज फक्त हजेरी लावून गेले. विराट कोहली बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला पांड्या शून्यावर बाद झाला. पांड्यानंतर धोनी आणि पंतने डाव सावरला पण पंत बाद झाल्यानंतर शेवटच्या सहा षटकांत भारताला 37 धावाच करता आल्या. मात्र आता धोनीच्या मदतीला सचिन तेंडुलकर धावून आला आहे. सचिननं धोनीनं, "जे काही केले ते संघासाठी केले", असे मत व्यक्त केले आहे.

मधल्या फळीची चिंता

वर्ल्ड कपमध्ये आठ पैकी 7 सामन्यात भारताने चौथ्या क्रमांकावर चार खेळाडूंना खेळवलं आहे. यात एकदा केएल राहुल, हार्दिक पांड्या, पंत खेळले आहेत. तर दोन वेळा विजय शंकर खेळला आहे. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर बांगलादेशविरुद्ध पंतने 48 धावांची केलेली खेळी वगळता इतर सामन्यात निराशाच पदरी पडली. भारताने इंग्लंडविरुद्धचा सामना वगळता इतर सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताला अफगाणिस्तानने जबरदस्त झुंज दिली. स्पर्धेत भारताच्या गोलंदाजांनी आणि आघाडीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी मधल्या फळीची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

बांगलादेशविरोधात धोनीची खेळी महत्त्वाची

सचिननं सामन्यानंतर, "बांगलादेशविरोधात धोनीची खेळी महत्त्वाची होती. त्यानं तेच केले ज्याची संघाला सर्वात जास्त गरज होती. जर धोनी 50 ओव्हरपर्यंत खेळत असेल तर, त्यानं केलेल्या धावा या भारतासाठी महत्त्वपुर्णच आहेत", असे मत व्यक्त केले.

फॅन्सच्या निशाण्यावर धोनी

महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कपमध्ये सध्या चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. इंग्लंड विरोधात त्यानं 31 चेंडूत 42 धावा केल्या होत्या, त्यामुळं त्याला ट्रोल करण्यात आले होते. त्याच मैदानावर बांगलादेशविरोधात धोनीनं 33 चेंडूत 35 धावा केल्या, यात चार चौकारांचा समावेश होता. फॅन्सच्या म्हणण्यानुसार धोनी फिनीशर म्हणून खेळत नाही. त्यामुळं त्याला ट्रोल करण्यात आले होते.

सचिननं याआधी केली होती टिका

अफगाणिस्तान विरोधात भारताच्या फलंदाजीवरून सचिन तेंडुलकरनं धोनीवर टिका केली होती. सचिननं धोनीनं चेंडू खुप खाल्ले म्हणून टिका केली होती. यावरून धोनी आणि सचिनच्या चाहत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती.

वाचा- World Cup : टीम इंडियाचं सेमीफायनल चॅलेंज, भिडणार 'या' संघाशी

वाचा- टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक! 'या' चार संघांच्या स्वप्नांचा केला चुराडा

वाचा-  World Cup : पंचांशी हुज्जत, विराटवर होऊ शकते सामनाबंदीची कारवाई!

VIDEO: मध्य रेल्वेचा गलथानपणा प्रवाशांच्या जीवावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 11:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading