IND vs NZ : जडेजा की कार्तिक, कोणाला मिळणार संधी? सचिननं सांगितला अकरा जणांचा संघ

भारत-न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सेमीफायनलमध्ये कोणते अकरा खेळाडू संघात असावेत याबाबत सचिन तेंडुलरकरनं माहिती दिली.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 10:30 PM IST

IND vs NZ : जडेजा की कार्तिक, कोणाला मिळणार संधी? सचिननं सांगितला अकरा जणांचा संघ

मॅंचेस्टर, 08 जुलै : ICC Cricket World Cup 2019मध्ये मंगळवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे. या सामन्यात भारत कोणत्या 11 खेळाडूंसोबत खेळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. श्रीलंकेविरोधात भारतीय संघानं युजवेंद्र चहल आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली होती. तर, संघात रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांना घेतले होते. त्यामुळं सेमीफायनलमध्ये काय समीकरण असणार, हे पाहणे महत्त्वाचे असेल. दरम्यान महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं त्याला कोणते खेळाडू संघात हवेत याबाबत माहिती दिली.

श्रीलंकेविरोधात रविंद्र जडेजाला पहिल्यांदाच संघात स्थान दिले होते. त्यानं या सामन्यात एक विकेट घेत, चांगले क्षेत्ररक्षणही केले होते. मात्र, संघात मोहम्मद शमीला स्थान द्यायचे असल्यास रविंद्र जडेजाला संघातून वगळावे लागणार आहे.

सचिननं सांगितला आपला प्लेयिंग इलेव्हन

सेमीफायनल सामन्याआधी सचिननं संघात मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांना स्थान मिळावे असे सांगितले. इंडिया टूडेशी बोलताना सचिननं, "जडेजाला संघात घेण्यासाठी मी संघ व्यवस्थापनेकडे शिफारस करेन. जर दिनेश कार्तिक सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरणार असेल तर मला वाटतं त्याच्या जागी जडेजाला संधी मिळावी", असे सांगितले. तसेच, भारतानं पाच गोलंदाजांसोबतच खेळावे असेही सांगितले.

शमी संघासाठी महत्त्वाचा

Loading...

सचिन तेंडुलकरनं मोहम्मद शमीला न्यूझीलंड विरोधात खेळण्यास संधी मिळावी, असे सांगितले. शमीनं वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 14 विकेट घेतल्या आहेत. अफगाणिस्तानविरोधात शमीनं हॅट्रीक घेतली होती. त्यामुळं सचिननं शमीची संघातली स्थान कायम ठेवावे, असे सांगितले.

असा आहे सचिनचा संघ- के.एल. राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, एम एस धोनी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव.

वाचा- यॉर्कर किंग बुमराहनं सांगितला भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा फॉर्म्युला

वाचा- इंग्लंड असो की ऑस्ट्रेलिया World Cup भारतच जिंकणार, 'हा' घ्या ठोस पुरावा!

वाचा- World Cup: टीम इंडियाकडे शेवटची संधी; 44 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेणार!

VIDEO: 'दुपारच्या प्रहरी, अश्व धावले रिंगणी', पाहा नयनरम्य रिंगण सोहळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...