कॅप्टन कुलनंतर आता सगळे कॅप्टन सुपरकुलच्या प्रेमात, 'या' खेळाडूचा सचिनही झाला फॅन

कॅप्टन कुलनंतर आता सगळे कॅप्टन सुपरकुलच्या प्रेमात, 'या' खेळाडूचा सचिनही झाला फॅन

महान फलंदाज मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरही या लढवय्या कर्णधाराचा चाहता झाला आहे.

  • Share this:

लंडन, 16 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये यजमान इंग्लंडने अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या जोरावर चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. मात्र, या सामन्याच रोमांच एवढा होता की, सुपर ओव्हरमध्येही हा सामना टाय झाला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विजेते घोषित करण्यात आले.

या सामन्यात इंग्लंडकडून बेन स्टोक्स याने सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र इंग्लंड संघापेक्षा सर्वात जास्त कौतुक झाले ते, न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन याचे. कारण, सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजूने लागला नसूनही विल्यमसनने आपल्या चेहऱ्यावर हास्य कायम ठेवले होते. एवढेच नाही तर त्याला वर्ल्ड कपमध्ये मालिकावीराचा किताबही प्रदान करण्यात आला. यामुळं सध्या सोशल मीडियावर कॅप्टन सुपरकुल हा हॅशटॅग ट्रेण्ड करत आहे. याआधी कॅप्टन कुल म्हणून धोनीच्या नावाची चर्चा असायची मात्र आता केनची ओळख सुपरकुल कॅप्टन झाली आहे.

दरम्यान फक्त सोशल मीडियाच नाही तर, महान फलंदाज मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरही या लढवय्या कर्णधाराचा चाहता झाला आहे.

सचिननं आपल्या ट्विटमध्ये, "केन विल्यमसननेदेखील मला प्रभावित केले. त्याने ज्या प्रकारचा खेळ करून दाखवला, ज्या प्रकारे तो मैदानावर वावरत होता आणि ज्या प्रकारे त्याने संघाचे नेतृत्व केले, त्या साऱ्या गोष्टी पाहून मी त्याच्या प्रेमात पडलो आहे", अशा शब्दात विल्यम्सनचे कौतुक केले.

वाचा- वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका

पहिल्यांदाच विल्यम्सनची सर्वश्रेष्ठ कामगिरी

न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सनला वर्ल्ड कपची ट्रॉफी मिळाली नसली तरी मालिकावीराच्या पुरस्कारासोबतच पहिल्यांदाच 799 आकड्यांचा टप्पा त्यानं गाठला . भारताविरोधात सेमीफायनलमध्ये केनंन महत्त्वपूर्ण अशी 67 धावांची खेळी केली. सध्या केन एकदिवसीय क्रिकेटच्या रॅंकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.

वाचा- टी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना

VIDEO : मुलांना मांडीवर घेऊन वाचवलं अन् तिने मृत्यूला कवटाळलं!

First published: July 16, 2019, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading