World Cup : रोहितच्या 'त्या' सिक्सरवर सचिनचं मुंबई कनेक्शन म्हणाला...

पाकिस्तान विरोधातल्या सामन्यात रोहिनं मारलेला षटकार पाहून 2003च्या सचिनच्या षटकाराची आठवण होईल.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 02:03 PM IST

World Cup : रोहितच्या 'त्या' सिक्सरवर सचिनचं मुंबई कनेक्शन म्हणाला...

मॅंचेस्टर, 18 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारत-पाकिस्तान या हायवोल्टेज सामन्यात भारतानं पाकिस्तानला नमवलं. यापूर्वी भारतानं पाकिस्तानला 1992च्या वर्ल्ड कपमध्ये 43 धावांनी, 1996 साली 39 धावांनी, 1999 मध्ये 47 धावांनी, 2003 मध्ये 6 विकेट्सने, 2011मध्ये 29 धावांनी आणि 2015 मध्ये 76 धावांनी पराभूत केले होते.

या सामन्यात आकर्षण ठरला तो रोहित शर्मा. रोहित शर्माच्या 140 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघानं 336 धावांचे आव्हान पाकिस्तानला दिले. रोहितच्या 140 धावांच्या खेळीत आकर्षण ठरले तो त्याचा एक षटकार, हा शॉट पाहून सर्वांनीच त्यांची तुलना सचिनशी केली. रोहितने पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात लगावलेल्या त्या एका षटकारामुळे 2003 साली वर्ल्ड कपमध्ये सचिननं मारलेल्या त्या षटकाराच्या आठवणी जागा झाल्या.

पाहा हा व्हिडिओ-


पाहा सचिनचा तो सिक्स

Loading...


फक्त फरक एवढाच आहे की, या 2003मध्ये सचिननं 98 धावांची खेळी केली होती. मात्र, रोहितनं आपले शतक पूर्ण केले. रोहितच्या या षटकारावर आता सचिन तेंडुलकरनं प्रतिक्रिया दिली आहे. सचिननं, "आम्ही दोन्ही खेळाडू भारतासाठी खेळतो आणि आमची मुंबईचे आहोत. त्यामुळं हेडस आला तर मी जिंकणार आणि टेल्स आला तर तू हरणार" असे मिश्किल ट्विट केले.आयसीसीनं रोहित की सचिन कोणी उत्तम षटकार मारला असा सवाल विचारला होता, यावर सचिननं ही प्रतिक्रिया दिली.

वाचा- सानियानं काढला 'ती'च्यावर राग म्हणाली, 'मी पाकिस्तान संघाची आई नाही'

वाचा-World Cup : इंग्लंडची चिंता वाढली, ऐन वर्ल्ड कपमध्ये बदलावा लागणार कर्णधार

वाचा- World Cup : ठरलं ! 'या' चार संघांना मिळणार सेमीफायनलचे तिकीट


लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल


लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 12:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...