World Cup : धोनी निवृत्ती घेणार का? मास्टर ब्लास्टर सचिननं दिले उत्तर

World Cup : धोनी निवृत्ती घेणार का? मास्टर ब्लास्टर सचिननं दिले उत्तर

भारत वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या निवृत्तीवर गेले काही दिवस अनेक बातम्या येत आहेत. त्यातच न्यूझीलंडकडून वर्ल्ड कपमध्ये भारताला मिळालेल्या पराभवानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान बीसीसीआच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी धोनी वर्ल्ड कपनंतर कधीही निवृत्ती जाहीर करू शकतो, असे सांगितले होते. त्यामुळं न्यूझीलंड विरोधात धोनीनं खेळलेला सामना भारतासाठी शेवटचा सामना असू शकतो. याबद्दल कर्णधार विराट कोहलीला विचारण्यात आलं होतं. मात्र, त्यानं धोनीने आपल्याला काही सांगितलं नसल्याचं म्हटलं होतं.

आता या सगळ्यावर महान फलंदाज सचिन तेंडुलरकरनं प्रतिक्रिया दिली आहे. सचिननं, "निवृत्ती संदर्भात जो काही निर्णय असेल तो धोनीनं घ्यावा, त्यानं क्रिकेटची सेवा केली आहे. त्यामुळं निवृत्ती घेण्याचा अधिकार हा त्यांनाच आहे", असे मत व्यक्त केले आहे. इंडिया टुडेशी बोलताना सचिननं, "निवृत्तीचा निर्णय हा सर्वस्वी खेळाडूचा आहे. त्याच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे", असे मत व्यक्त केले आहे.

धोनीसारखे करिअर फार कमी लोकांना मिळते

धोनीच्या खेळीचे कौतुक करताना तेंडुलकरनं, "धोनी सारखा खेळाडू खास आहे. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती, तेव्हा तो खेळला. त्याला लोकांनी वेळोवेळी समर्थन केले आहे", असे मत व्यक्त केले. सेमीफायनलमध्ये आघाडी आणि सलामीचे फलंदाज

ढेपाळल्यानंतर धोनी आणि जडेजा यांनी शतकी भागिदारी करत भारताचा डाव सावरला. धोनीनं सेमीफायनलमध्ये अर्धशतकी खेळी केली आहे, आणि तो धावबाद झाला. त्याचबरोबर भारतानं सामनाही गमावला.

बीसीसीआयनं दिली पहिली प्रतिक्रिया

आता धोनीच्या निवृत्तीबाबत बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना आणि प्रशासकिय समितीच्या सदस्या डायना इडुल्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डायना इडुल्जी यांनी म्हटलं की, पुर्ण स्पर्धेत त्यानं जी कामगिरी केली त्याचं कौतुक आहे. त्यानं निवृत्ती कधी घ्यावी हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. याबद्दल तो आणि त्याचं शरीर सांगू शकतं. मला वाटतं की त्याचात अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. तसेच धोनीच्या मार्गदर्शनाची युवा खेळाडूंना गरज आहे.

वाचा- IPLचा 'हा' नियम वर्ल्ड कपमध्ये का नाही? विराटचा ICCला सवाल

वाचा- World Cup : विराट नाही तर वर्ल्ड कपनंतर रोहितकडे असणार कर्णधारपद?

वाचा- World Cup : हिटमॅनची एक धाव, फायनलमध्ये दोन फलंदाजांना शतकाची गरज!

VIDEO: जगबुडीचं रौद्र रूप! मुसळधार पावसामुळे नदीनं ओलांडली धोक्याची पातळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 11:46 AM IST

ताज्या बातम्या