World Cup : सचिनच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये विराटचं कर्णधारपद गेलं, धोनीला डच्चू

World Cup : सचिनच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये विराटचं कर्णधारपद गेलं, धोनीला डच्चू

याआधी अफगाणिस्तान विरोधात धोनीनं केलेल्या धिम्या फलंदाजीवर सचिनंन टीका केली होती.

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये इंग्लंडनं न्यूझीलंडला रोमांचक सामन्यात धक्का देत आपलं पहिले वर्ल्ड कप जिंकले. दरम्यान या वर्ल्ड कपमध्ये खेळाडूंच्या खेळीवर महान फलंदाज सचिननं एक प्लेयिंग इलेव्हनचा संघ तयार केला आहे. मात्र, यात भारताचा माजी कर्णधार आणि फिनीशर महेंद्रसिंग धोनीला याला डच्चू देण्यात आला आहे. अफगाणिस्तान विरोधात धोनीनं केलेल्या धिम्या फलंदाजीवर सचिनंन टीका केली होती. त्यानंतर मात्र सचिननं धोनीची बाजू घेत, त्याच्या खेळीचे समर्थन केले होते. मात्र आपल्या अकरा खेळाडूंच्या संघात धोनीला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

सचिनच्या संघात पाच भारतीय खेळाडू आहेत. यात सेमीफायनलमध्ये 77 धावांची अनोखी खेळी करणाऱ्या ऑल राऊंडर रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त धावा करणारा भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माचाही सचिननं आपल्या संघात समावेश केला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रवींद्र जडेजाच्या खेळीचे कौतुक करताना सचिननं, "जडेजाला संघात स्थान देण्यावरून माझ्यावर टीका होईल. मात्र सेमीफायनलमध्ये जडेजानं 77 धावांची जी खेळी केली, त्यावर मी खुप खुश आहे", असे समालोचन करताना सांगितले.

वर्ल्ड कपमध्ये खेळाडूंनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर सचिननं आपल्या संघाचे कर्णधारपद न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला दिले आहे. तर, भारतीय संघातील रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या खेळाडूंना संघात जागा दिली आहे.

असा आहे सचिनचा संघ

रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, केन विल्यम्सन(कर्णधार), विराट कोहली, शाकिब अल हसन, बेन स्टोक्स, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मिशेल स्टार्क, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.

वाचा- World Cup : इंग्लंडच्या विजयानंतर पेटला वाद, ICCला दिग्गजांनी धरले धारेवर

वाचा- World Cup : इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा ICCचा 'हा' नियम आहे तरी काय?

वाचा- World Cup: फायनलमध्ये पंचांनी केल्या चुका, म्हणून जिंकले इंग्लंड...

वाचा- इंग्लंडनं पहिल्यांदाच जिंकला वर्ल्ड कप, तरी ICCने दिली नाही खरी ट्रॉफी

दोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV

First published: July 15, 2019, 12:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading