World Cup मध्ये रोहितच हिट! पाहा कोण आहेत टॉप 5 फलंदाज

ICC Cricket World Cup भारताचा सलामीवीर रोहित शर्माने एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 09:46 PM IST

World Cup मध्ये रोहितच हिट! पाहा कोण आहेत टॉप 5 फलंदाज

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं सेमीफायनलला धडक मारली आहे. भारताच्या या कामगिरीत हिटमॅन रोहित शर्माने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यानं 8 सामन्यात 90 च्या सरासरीनं 647 धावा करत स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलं आहे. यात 5 शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

लंकेविरुद्ध शतक करून एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला. त्याने श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा विक्रम मोडला. संगकाराने 2015च्या वर्ल्ड कपमध्ये 4 शतके झळकावली होती. यावेळी रोहित शर्माने 5 शतके केली आहेत.

रोहित शर्मानंतर बांगलादेशच्या शाकिबचा क्रमांक लागतो. त्यानं 8 सामन्यात त्याने 108 च्या सरासरीने 606 धावा केल्या असून यात 5 अर्धशतकं आणि दोन शतकांचा समावेश आहे.

गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नरने 8 सामन्यात 73 च्या सरासरीनं 516 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि दोन अर्धशतकं आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तो तिसऱ्या स्थानावर आहे.

चौथ्या क्रमांकावर अॅरॉन फिंच असून त्यानं 8 सामन्यात 63 च्या सरासरीनं 504 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

Loading...

इंग्लंडचा जो रूट वर्ल्ड कप 2019 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यामध्ये पाचव्या स्थानावर आहे. त्याने 9 सामन्यात 2 शतकं आणि 3 अर्धशतकांसह 68 च्या सरासरीनं 504 धावा केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 09:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...