World Cup : रोहितनं पुन्हा घेतला ICCशी पंगा, वर्ल्ड कप फायनलबाबत म्हणाला...

World Cup : रोहितनं पुन्हा घेतला ICCशी पंगा, वर्ल्ड कप फायनलबाबत म्हणाला...

सामन्यानंतर दिग्गजांनी आणि चाहत्यांनी आयसीसीच्या नियमांवर नाराजी व्यक्त केली. रोहितनेही आता ICCला फैलावर घेतले आहे.

  • Share this:

लंडन, 15 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये इंग्लंड आणि न्यूजीलंड यांच्यात रोमांचक अंतिम सामना झाला. हा रोमांच एवढा होता की सामना टाय होऊन सुपरओव्हर पर्यंत गेला, त्यानंतर ही सुपर ओव्हरही टाय झाली. त्यामुळे यजमान इंग्लंड यांना सामान्यात सर्वात जास्त चौकार लगावल्यामुळे चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळाला. दरम्यान वर्ल्ड कपच्या इतिहासात चारवेळा अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या इंग्लंडने पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. 648

मात्र, सामन्यानंतर दिग्गजांनी आणि चाहत्यांनी आयसीसीच्या या नियमावर नाराजी व्यक्त केली. यात आता भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मानेही आयसीसीला फैलावर घेतले आहे. रोहितनं, "क्रिकेटमधील काही नियम बदलणे गरजेचे आहे", असे ट्वीट करत आयसीसीला टोला लगावला आहे.

याआधी रोहितनं आयसीसी आणि पंचावर टीका केली होती. वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिज विरोधात रोहित नाबाद असूनही त्याला बाद ठरवण्यात आले होते.

वाचा- World Cup : इंग्लंडच्या विजयानंतर पेटला वाद, ICCला दिग्गजांनी धरले धारेवर

रोहितनं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 648 धावा केल्या, सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित पहिल्या क्रमांकावर आहे. या वर्ल्ड कपमध्ये रोहितनं सर्वात जास्त म्हणजेच पाच शतक करण्याचा विक्रम केला आहे. मात्र न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात रोहित केवळ एका धावावर बाद झाला. सलामीच्या आणि आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशामुळं भारताचं वर्ल्ड कपमधील स्वप्न भंगलं.

भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर रोहितने भावनिक ट्विट केले. "जेव्हा चांगली खेळण्याची गरज होती, तेव्हा आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. 30 मिनिटांच्या आमच्या खराब खेळीमुळं आम्हाला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. माझे अंतकरण जड झालेआहे, खात्री आहे मला तुम्हालाही तसेच वाटत असेल. तरी, घरापासून लांब खेळत असतानाही चाहत्यांनी आम्हाला समर्थन केले. इंग्लंडमध्ये आम्हाला निळा रंग जास्त दिसत होता", असं रोहितनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

वाचा- World Cup : इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा ICCचा 'हा' नियम आहे तरी काय?

वाचा- World Cup: फायनलमध्ये पंचांनी केल्या चुका, म्हणून जिंकले इंग्लंड...

2011मध्ये वर्ल्ड कप संघात नव्हते मिळाले स्थान

रोहित शर्माला 2011च्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले नव्हते. निवड समितीनं रोहित शर्माच्या जागी युसूफ पठाणला संघात स्थान देण्यात आले होते. रोहित शर्माला आजही या गोष्टीचे वाईट वाटते. 2015च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितला संघात स्थान देण्यात आले होते. मात्र सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला पराभूत केले होते. त्यामुळं शतक करण्यापेक्षा रोहितसाठी वर्ल्ड कप जिंकणे महत्त्वाचे होते. त्यामुळं त्याला जास्त वाईट वाटले.

रोहित शतकांचा बादशाह

2011च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर 2012मध्ये रोहितनं 2 शतक केले होते. 2015मध्ये रोहितनं एकूण 22 शतक केले होते. शतक करण्यात रोहितनं विराटला मागे टाकले आहे.

वाचा- इंग्लंडनं पहिल्यांदाच जिंकला वर्ल्ड कप, तरी ICCने दिली नाही खरी ट्रॉफी

इंग्लंडचा विजय ते चांद्रयान-2चं प्रक्षेपण रद्द, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

First published: July 15, 2019, 12:59 PM IST

ताज्या बातम्या