World Cup : रोहितला शहाणपणा शिकवण्याआधी हे वाचा...

कोणत्याच भारतीय खेळाडूला जे जमलं नाही ते रोहितनं करुन दाखवले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 11:03 PM IST

World Cup : रोहितला शहाणपणा शिकवण्याआधी हे वाचा...

लंडन, 27 मे : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारताने पहिला सामना जिंकला.गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 227 धावांत रोखल्यानंतर हिटमॅन रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने 6 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात रोहितने संयमी खेळी करत 144 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या.

यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाकडून सर्वांच्याच अपेक्षा आहेत. यात भारताचा सलामी बल्लेबाज रोहित शर्माच्या बॅट तळपली तर, भारतीय संघ हमखास यंदाच्या विश्वचषकाला गवसणी घालु शकतो. एकदिवसीय सामन्यात 3 द्विशतकं लगावणाऱ्या रोहितने गेल्या तीन वर्षांत खोऱ्यानं धावा केल्या आहेत. तरीही त्याच्या संथ सुरुवातीवर नेहमीच टीका करतात.

रोहित शर्मा आणि शिखर धवन हे भारताचे सलामीचे धडाकेबाज फलंदाज असूनही, रोहित पहिल्या 10 ओव्हरमध्ये धीम्या गतीनं धावा काढतो, असा आरोप त्याच्यावर केला जातो. यामुळेच तो सर्वात धिम्या गतीचा फलंदाज ठरला आहे, त्यानंतर बांगलादेशच्या तमीम इकबाल याचा नंबर लागतो. मात्र, जर आपण रोहितच्या 10 ओव्हरनंतरचा रनरेट पाहिला तर, तुम्हाला आश्चर्य वाटेल. याबाबत रोहितनं टाईम्स ऑफ इंडियाशी केलेल्या चर्चेत, " ही माझी योजना आहे. मी जेव्हा दुहेरी शतक लगावले होते, तेव्हाही पहिल्या 10 ओव्हरमध्ये मी 10, 50 आणि 70-80 धावा केल्या होत्या. त्यामुळं माझी सुरुवात धिमी असली तरी, त्याचा संघाला फायदाच होतो", असे मत व्यक्त केले होते.

लेक्चर देणाऱ्यांची संख्या कमी नाही

रोहित शर्मा म्हणतो, तीन दुहेरी शतक मारुनही लोक मला टिप्स देतात. मला लेक्चर देणाऱ्यांनी संख्या कमी नाही आहे. मी फक्त एकतो, या गोष्टींचा माझ्यावर थेट परिणाम होत नाही. घरातून बाहेर पडताच मला जी लोक भेटतात ती म्हणतात, स्ट्रेट ड्राईव्ह नीट मार, कव्हर ड्राईव्ह सुधार असे सल्ले देतात. त्यामुळं माझ्या आयुष्यात खुप लेक्चर देणारी लोक आहेत.

Loading...

15 ओव्हरमध्ये बनवतो बुलेट ट्रेन सारख्य धावा

रोहितची आकडेवारी पाहिली तर, आपल्या लक्षात येईक की, 11 ते 35 ओव्हरमध्ये रोहितनं धावा केल्या आहेत. यात रोहित 8व्या क्रमांकावर आहे. मात्र शेवटच्या 15 ओव्हरमध्ये रोहितनं सर्वात जलद धावा केल्या आहेत. पहिल्या10 ओव्हरमध्ये रोहितचा स्ट्राईक रेट 75 आहे तर, 11 ते 35 ओव्हरमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 101.22 आहे. तर, शेवटच्या 15ओव्हरमध्ये रोहित 153.56च्या स्ट्राईक रेटनं धावा करतो. तरी त्याला धिम्या गतीचा फलंदाज म्हटले जाते.

2015च्या विश्वचषकानंतर मारले 130 षटकार

शेवटच्या 15 ओव्हरमध्ये 2015च्या विश्वचषकानंतर रोहितनं सर्वात जास्त म्हणजे 130 षटकार लगावले आहे. यानंतर विराटचा क्रमांक लागतो. विराटनं 55 षटकार लगावले आहेत. असे असुनही त्याच्यावर टीका केली जाते.

वाचा : World Cup : चहलचा 'बॉल ऑफ द सेंच्युरी', 'लगान'च्या कचराची आठवण करून देणारा VIDEO

वाचा : विराटचं नाणं खणखणीत, जे 20 वर्षांत जमलं नाही ते चहलनं केलं


SPECIAL REPORT: वर्ल्ड कपदरम्यान चॅम्पियन धोनीच्या जिवाला धोका


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 11:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...