World Cup : भारतीय संघातील 'हा' खेळाडू अस्वच्छ आणि घाणेरडा, रोहितनं केली पोलखोल

World Cup : भारतीय संघातील 'हा' खेळाडू अस्वच्छ आणि घाणेरडा, रोहितनं केली पोलखोल

रोहितनं भारतीय संघातील काही खेळाडूंचे मजेशीर किस्से सांगितले.

  • Share this:

लंडन, 27 मे : आयसीसी विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा भारतीय संघ सध्या विश्वचषकासाठी जय्यत तयारी करत आहे. यात विराट सेनेच्या नेतृत्वाखाली प्रथमच खेळणाऱ्या भारतीय संघाचे सर्वच खेळाडू सध्या संघ बांधणीवर भर देत आहेत. दरम्यान रोहित शर्मा आणि शिखर धवन ही सलामीची जोडी सध्या न्युझीलंड विरोधात झालेल्या सराव सामन्यात चांगली कामगिरी करु शकले नाही. मात्र एकदिवसीय क्रिकेटमधली सर्वात यशस्वी जोडी आहे.

मात्र, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची मैदानावर जेवढी चर्चेत असते, तेवढीच ही जोडी मैदानाबाहेरही चर्चेत असते. मैदानाबाहेरील या दोघांच्या मैत्रीचेही अनेक किस्से खूपदा या दोघांनी सांगितले आहेत. पण नुकतंच एका व्हिडीओ मुलाखतीत रोहित शर्मानं शिखर धवन बाबात एक मोठा गौप्यस्पोट केला आहे. रोहितनं आपला साथीदार असलेल्या शिखर धवनला चक्क अस्वच्छ आणि घाणेरडा म्हंटले आहे. 30 मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. भारताचा पहिला सामना साऊथ आफ्रिकेविरोधात 5 जूनला होणार आहे. तर, सध्या सराव सामने सुरु आहेत. दरम्यान बीसीसीआयनं शेअर केलेल्या व्हिडिओत एकमेकांबद्दलचे अनुभव शेअर केले आहेत. यात रोहित शर्माला काही प्रश्न विचारण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये रोहितने शिखर धवन हा अत्यंत घाणेरडा आणि अस्वच्छ असा खेळाडू आणि रूममेट असल्याचे सांगितले आहे.

तसेच, रोहितनं सतत हातात फोन घेऊन बसणारा भारतीय संघातील खेळाडूचे नावही जाहीर केले आहे. यात पहिला क्रमांक लागतो तो, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांचा. तर, सगळ्यात जास्त सेल्फी काढणारा, वाईट डान्सर, गुगलवर स्वतःचेच नाव सर्च करणारा कोणता खेळाडू याचे उत्तरही त्यानं हार्दिक पांड्या असेच दिले. भारतीय संघ मजा-मस्ती करत असला तरी, त्यांचा कसुन सराव सध्या सुरु आहे.

असे असतील भारताचे सामने

5 जून : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (दु. 3 वाजता)

9 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिय (दु. 3 वाजता)

13 जून : भारत विरुद्ध न्युझीलॅंड (दु. 3 वाजता)

16 जून : भारत विरुद्ध पाकिस्तान (दु. 3 वाजता)

22 जून : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दु. 3 वाजता)

27 जून : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (दु. 3 वाजता)

30 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (दु. 3 वाजता)

2 जुलै : भारत विरुद्ध बांगलादेश (दु. 3 वाजता)

6 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (दु. 3 वाजता)

VIDEO कोण बिघडवतंय औरंगाबादची शांतता? पाहा स्पेशल रिपोर्ट

First published: May 27, 2019, 8:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading