हेडिंग्ले, 06 जुलै : icc world cup 2019मध्ये 600 हून अधिक धावा, 5 शतके, 90पेक्षा अधिकची सरासरी आणि 100च्या जवळपास स्ट्राइक रेट भारताचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) याची ही कामगिरी आहे. वर्ल्ड कपमधील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात लंकेविरुद्ध शतक करून त्यानं विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. केएल राहुल आणि रोहित शर्माने दीडशतकी भागिदारी करून भारताला भक्कम स्थितीत पोहचवलं आहे. भारताने सेमीफेयनलमध्ये प्रवेश केला असल्यानं या सामन्यात कोणताही दबाव नाही पण विजय मिळवल्यास गुणतक्त्यात भारताला अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी आहे. या उलट श्रीलंकेसाठी हा सामना केवळ औपचारीकता आहे. लंकेने 8 पैकी प्रत्येकी 3 सामन्यात विजय आणि पराभव स्विकारला आहे. त्यांचे 8 गुण आहेत. त्यामुळे भारताविरुद्धचा सामना हा लंकेसाठी सराव सामना पुरताच महत्त्वाचा आहे.
लंकेविरुद्ध शतक करून एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला. त्याने श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा विक्रम मोडला. संगकाराने 2015च्या वर्ल्ड कपमध्ये 4 शतके झळकावली होती. यावेळी रोहित शर्माने 5 शतके केली आहेत.
A stunning third 💯 in a row for Rohit Sharma and his fifth of #CWC19 👏
— ICC (@ICC) July 6, 2019
A wonderful achievement for the Indian opener!#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/BXYOoVek77
सचिनचा विक्रमाशी बरोबरी
वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वर्ल्ड कपमध्ये 6 शतके केली आहेत. या वर्ल्ड कपमधील पाच आणि 2015 च्या वर्ल्ड कपमधील एक अशी एकूण 6 शतके करत रोहित शर्माने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली.
2019मध्ये रोहित ठरला 'हिट'
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने दमदार कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित पहिल्या स्थानावर आहे. रोहितने आतापर्यंत 647 धावा केल्या आहेत. यात 5 शतकांचा देखील समावेश आहे. गेल्या 3 सामन्यात तीन शतके झळकावली आहेत. रोहितने इंग्लंडविरुद्ध 102 आणि त्यानंतर बांगलादेशविरुद्ध 104 आणि लंकेविरुद्ध 103 धावा केल्या. याआधी रोहितने श्रीलंकेविरुद्ध द्विशतक केले आहे.
VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!