World Cup : वादग्रस्तरित्या आऊट दिल्यानंतर रोहितची पहिली प्रतिक्रिया, काही क्षणांतच ट्वीट व्हायरल

World Cup : वादग्रस्तरित्या आऊट दिल्यानंतर रोहितची पहिली प्रतिक्रिया, काही क्षणांतच ट्वीट व्हायरल

रोहित शर्माच्या वादग्रस्तरित्या बादनंतर पहिल्यांदाच रोहितनं दिली प्रतिक्रिया.

  • Share this:

मॅंचेस्टर, 28 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात भारतानं 125 धावांनी विजय मिळवला. भारतानं दिलेल्या 269 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संपुर्ण संघ केवळ 143 धावांवर बाद झाला. यात शमीनं घेतलेल्या 4 विकेट आणि बुमराहनं लागोपाठ घेतलेल्या 2 विकेट महत्त्वाच्या ठरल्या.

मात्र, या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधले ते रोहित शर्मानं. भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताचा सलामीवीर रोहित शर्मा फक्त 18 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही रोहित शर्मा एक धाव काढून बाद झाला होता. केमार रोचच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा यष्टीरक्षक शाय होपकडे झेल देऊन बाद झाला.

रोहित शर्माच्या झेलबादचे अपिल केल्यानंतर मैदानावरील पंचांनी ते फेटाळून लावलं होतं. मात्र, वेस्ट इंडिजने डीआरएस घेतला. यात तिसऱ्या पंचांनी रोहितला बाद दिलं. रोहित टिव्ही रिप्लेमध्ये चेंडू बॅटला नाही तर पॅडला लागून गेल्याचं दिसत होतं. त्यातही बॅट आणि पॅड दोन्हीही चेंडूच्या जवळ असल्यानं नेमका चेंडू कशाला लागला हे स्पष्ट झालं नाही.

तिसऱ्या पंचांनी अल्ट्रा एजमध्ये पाहून रोहित शर्माला झेलबाद दिलं. हा निर्णय दिल्यानंतर रोहितलासुद्धा धक्का बसला. त्याने पंचांचा निर्णय मान्य केला आणि मैदान सोडले. पण त्याला वाटत होते की चेंडू बॅटला लागलेला नाही. मैदानावरून बाहेर जाताना पंचांच्या निर्णयावर त्याची नाराजी लपून राहिली नाही.

मात्र, सामन्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू व्हि. व्हि. लक्ष्मण, संजय मांजरेकर, हरभजन सिंग, आकाश चोप्रा, इरफान पठाण यांनी रोहित शर्मा नाबादच होता असे मत व्यक्त केले. तसेच, व्हि व्हि एल लक्ष्मण यांनी, "पंचांनी घाईमध्ये निर्णय घेतला. त्यांनी थोटा वेळा घ्यायला हवा होता. एवढ्या मोठ्या सर्धेत असे निर्णय घातक ठरू शकतात", असे मत व्यक्त केले. दरम्यान रोहित बाद झाल्यानंतर त्याची पत्नी रितीकाही पंचांवर भडकलेली दिसली.

आता या सगळ्या प्रकरणावर रोहित शर्मानं प्रतिक्रिया दिली आहे. रोहितनं ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यानंतर नेटकऱ्यांनीही थर्ड अम्पयारला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी डाव सांभाळला. मात्र त्यांना जास्त चांगली फलंदाजी करता आली नाही. सहाव्या विकेटसाठी हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्या 70 विकेटच्या भागिदारीच्या जोरावर भारतानं 269 धावांपर्यंत मजल मारली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ फक्त 143 धावा करू शकला. भारताने या विजयासह आपली सेमीफायनलचं तिकिट पक्कं केलं आहे. वेस्ट इंडीज फलंदाजीला उतरताच मोहम्मद शमीने पहिला दणका दिला. शमीने दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. त्यानंतर पांड्याने अॅम्ब्रिसला आणि कुलदीप यादवने निकोलस पूरनला बाद केलं. चहलने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. बुमराहने ब्रेथवेट आणि अॅलनला सलग दोन चेंडूवर बाद केले. त्यानंतर शमीने आणि चहलने एक विकेट घेत विंडीजचा डाव संपुष्टात आणला.

वाचा- भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश, सेमीफायनलची समीकरणे बदलली

वाचा- World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!

वाचा- VIDEO : पाहा पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 02:39 PM IST

ताज्या बातम्या