IND vs PAK : 2003ची पुनरावृत्ती, रोहित की सचिन सांगा कोणाचा षटकार भारी

रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 07:34 PM IST

IND vs PAK : 2003ची पुनरावृत्ती, रोहित की सचिन सांगा कोणाचा षटकार भारी

मॅंचेस्टर, 16 जून : ICC Cricket Worldमध्ये होत असलेल्या भारत- पाकिस्तान यांच्यातील हायवोल्टेज सामन्यात विराटसेनं पाकच्या गोलंदाजांची शिकार केली. नाणेफेक जिंकत पाकिस्ताननं घेतलेला गोलंदाजीचा निर्णय त्यांनाच महागात पडला असल्याचे काहिसे चित्र भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये दिसले. पण पावसामुळं कॅप्टन कोहलीला देखील गोलंदाजी करायची होती. पण रोहित आणि केएल राहुल यांच्या सलामीच्या जोडीनं सर्वांचे अंदाज फोल ठरवले. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 136 धावांची भागिदारी केली आणि एक विक्रम केला.

या सामन्या केएल राहुलनं 57 धावांची खेळी केली. पण सर्वांचे लक्ष वेधले ते, रोहित शर्मानं. रोहितनं आक्रमी फलंदाजी करत 140 धावा केल्या, पण या सगळ्यात सर्वात चर्चेचा विषय ठरला तो, रोहित शर्माचा सचिनसारखा तो शॉट.

पाहा हा व्हिडिओ-


रोहितने पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात लगावलेल्या त्या एका षटकारामुळे 2003 साली वर्ल्ड कपमध्ये सचिननं मारलेल्या त्या षटकाराच्या आठवणी जागा झाल्या. रोहित शर्मा 85 धावांवर खेळत असताना त्यानं हसन अलीला मारलेला तो उत्तुंग षटकार तुम्हाला सचिनची आठवण करुन देईल. फक्त फरक एवढाच आहे की, या सचिननं 2003मध्ये 98 धावांची खेळी केली होती. मात्र, रोहितनं आपले शतक पूर्ण केले.

Loading...

पाहा सचिनचा तो सिक्स


भारताने प्रथम फलंदाजी करताना हिटमॅन रोहित शर्माच्या वेगवान शतकी खेळीच्या जोरावर 46.4 षटकांत 4 बाद 305 धावा केल्या आहेत. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर असल्यानं त्याच्या जागी खेळणाऱ्या केएल राहुलनं सलामीला येऊन अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागिदारी करून दमदार सुरुवात करून दिली. केएल राहुल 57 धावांवर बाद झाला. त्याने रोहित शर्मासोबत 136 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित शर्माने शतक साजरं केलं. रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले.

रोहित शर्माने 85 चेंडूत शतक पूर्ण केलं. याखेळीत रोहित तीनवेळा धावबाद होण्यापासून वाचला. त्यानंतर पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा आणि दिशाहीन गोलंदाजीचा रोहितने समाचार घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या 20 षटकांत एकदाही पायचितचे अपिल केलं नाही. त्यांना तशी संधीच भारतीय फलंदाजांनी दिली नाही. रोहित बाद झाला. त्यानंतर कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलिया विरोधातही हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी त्यानं 48 धावांची तुफान खेळी केली होती. मात्र, या सामन्यात पांड्या केवळ 26 धावा करत बाद झाला. तर, दुसरीकडे कोहलीनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या सामन्यात पाकिस्ताननं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण पाकिस्तानला त्यांचा हा निर्णय महागात पडत आहे.

रोहितनं उतरवली पाकची नशा, हायवोल्टेज सामन्यात झंझावती शतक

यांनी 147 धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वॉर्नर-फिंच यांनी 146 धावा केल्या होत्या. World Cup India vs Pakistan: येथे पाहा महामुकाबला Live


VIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...