Yuvraj Singh Retirement : रोहितनं उचलला चाहत्यांच्या मनातला मुद्दा, पण युवराज म्हणाला...

Yuvraj Singh Retirement : रोहितनं उचलला चाहत्यांच्या मनातला मुद्दा, पण युवराज म्हणाला...

तब्बल 17 वर्ष क्रिकेटची सेवा केल्यानंतर सोमवारी सिक्सर किंग युवराज सिंग यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

  • Share this:

मुंबई, 11 जून : तब्बल 17 वर्ष क्रिकेटची सेवा केल्यानंतर सोमवारी सिक्सर किंग युवराज सिंग यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आपल्या निवृत्तीची घोषणा करताना युवराज सिंग भावूक झाला होता. युवराज सिंगने क्रिकेट कारकिर्दीला 2000 मध्ये सुरुवात केली होती. त्यावेळी भारताचे नेतृत्व कर्णधार सौरव गांगुलीकडे होते. युवराज सिंगने क्रिकेट कारकिर्दीला 2000 मध्ये सुरुवात केली होती. त्यावेळी भारताचे नेतृत्व कर्णधार सौरव गांगुलीकडे होते. क्रिकेटमध्ये जवळपास 19 वर्षांची कारकिर्द गाजवलेला युवराज निवृत्तीवेळी खूपच भावूक झाला. युवराज म्हणाला की, निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी सचिन तेंडुलकर आणि जहीर खान यांच्याशी चर्चा केली होती.

युवराजनं निवृत्ती जाहीर केल्यानंतर ट्विटरवरुन त्याच्या पुढच्या वाटचालींना दिग्गज क्रिकेटपटू, त्याचे सहकारी आणि बॉलीवूड अभिनेत्यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र भारताचा सलामीचा फलंदाज हिटमॅन रोहित शर्मानं ट्विटवर, “ तुमच्या हातातून काही गेल्याशिवाय तुम्हाला कळत नाही, तुमच्याकडे काय होते. लव्ह यू भावा. पण तुला आणखी चांगला निरोप देता आला होता'', असे ट्विट केले. यावर युवराजनं, ''तुला माहिती आहे, माझी परिस्थिती काय आहे ती. तु एक दिग्गज खेळाडू आहेस, असाच खेळत राहा'', असे उत्तर दिले.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सुद्धा युवराज सिंगला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहली म्हणाला, "पाजी, देशासाठी खेळलेल्या उत्कृष्ठ करियरबद्दल अभिनंदन. आम्हाला तुम्ही अनेक आठवणी आणि विजय दिले. पुढील प्रत्येक गोष्टींसाठी माझ्याकडून आपल्याला शुभेच्छा."

तर, युवराजने आताच्या भारतीय संघात त्याचासारखं कोण आहे असं विचारल्यावर रिषभ पंतचे नाव घेतले. रिषभ पंतला वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळाले नसले तरी त्याच्यात क्षमता आहे असं युवराजने म्हटलं. तसेच, आय़सीसीची मान्यता असलेल्या टी20 लीगमध्ये खेळण्यासाठी युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्याचंही म्हटलं जात आहे. तर, युवराज कॅनडातील जीटी 20 आणि आयर्लंड, हॉलंडमधील यूरो टी 20 स्लॅम टूर्नामेंटमध्ये खेळण्याचा विचार करत आहे.

वाचा-विराटची चिंता वाढली, धडाकेबाज सलामीवीर पुढच्या सामन्याला मुकणार?

वाचा- अखेर पावसामुळं दक्षिण आफ्रिकेनं उघडले खाते, भारत तिसऱ्या क्रमांकावर

वाचा- भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट

पूर्वमोसमी पावसामुळे मुंबईत विमानसेवा विस्कळीत, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

First published: June 11, 2019, 9:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading