World Cup : 5 शतक करूनही नाही खूश, 8 वर्षांपासून रोहितच्या मनात खदखद

World Cup : 5 शतक करूनही नाही खूश, 8 वर्षांपासून रोहितच्या मनात खदखद

रोहित शर्माच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये पाच शतक करण्याचा विक्रम आहे. असे असले तरी, रोहित आनंदी नाही आहे.

  • Share this:

लंडन, 07 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये रोहित शर्माच्या फलंदाजीमुळं प्रतिस्पर्धी संघांची घाबरगुंडी उडाली आहे. श्रीलंकेविरोधात झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतानं एकहाती विजय मिळवला. याआधीच भारतीय संघानं बांगलादेशला नमवतं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. आता मात्र श्रीलंकेला नमवत भारतानं गुणतालिकेत पहिला क्रमांक गाठला आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मानं 103 धावांची विक्रम खेळी केली.

रोहित शर्माच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये पाच शतक करण्याचा विक्रम आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा रोहित पहिला फलंदाज ठरला आहे. असे असले तरी, रोहित आनंदी नाही आहे, त्याचे कारण म्हणजे 8 वर्षांपूर्वी त्याला मिळालेला एक धक्का.

2011मध्ये वर्ल्ड कप संघात नव्हते मिळाले स्थान

रोहित शर्माला 2011च्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले नव्हते. निवड समितीनं रोहित शर्माच्या जागी युसूफ पठाणला संघात स्थान देण्यात आले होते. रोहित शर्माला आजही या गोष्टीचे वाईट वाटते. 2015च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितला संघात स्थान देण्यात आले होते. मात्र सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला पराभूत केले होते. त्यामुळं शतक करण्यापेक्षा रोहितसाठी वर्ल्ड कप जिंकणे महत्त्वाचे आहे.

या वर्ल्ड कपमध्ये रोहितची कमाल

रोहित शर्मानं या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या विरोधात शतकी खेळी केली आहे. वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 647 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

रोहित शतकांचा बादशाह

2011च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर 2012मध्ये रोहितनं 2 शतक केले होते. 2015मध्ये रोहितनं एकूण 22 शतक केले होते. शतक करण्यात रोहितनं विराटला मागे टाकले आहे.

वाचा- World Cup : राहुल-रोहितची विक्रमी भागिदारी, दिग्गजांना टाकलं मागे

वाचा- रोहितची 64 वर्षापूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, 8 देशही करू शकले नाही 'ही' कामगिरी

वाचा- World Cup मध्ये रोहितच हिट! पाहा कोण आहेत टॉप 5 फलंदाज

VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 10:32 AM IST

ताज्या बातम्या