World Cup : पुन्हा एकदा भंगलं रोहित शर्माचं स्वप्न, सोशल मीडियावर व्यक्त केलं दु:ख

वर्ल्ड कपमधील सेमीफायनलच्या सामन्या भारताला मिळालेल्या पराभवामुळं रोहित शर्मा खचला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 03:14 PM IST

World Cup : पुन्हा एकदा भंगलं रोहित शर्माचं स्वप्न, सोशल मीडियावर व्यक्त केलं दु:ख

लंडन, 12 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं भारतीय संघाला 18 धावांनी पराभूत केले, यामुळं विराट, धोनीसह रोहित शर्माचेही वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. सेमीफायनलच्या सामन्यात रोहित शर्माला चांगली फलंदाजी करता आली नाही. केवळ 1 धाव करत रोहित शर्मा बाद झाला. मात्र यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहितनं तुफानी खेळी करत पाच शतक लागवले. त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 648 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

मात्र, वर्ल्ड कपमधील सेमीफायनलच्या सामन्या भारताला मिळालेल्या पराभवामुळं रोहित शर्मा खचला आहे. याआधी रोहितनं 2011ला भारतानं वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हा रोहितला संघात स्थान देण्यात आले नव्हते. तर, 2015मध्येही भारतीय संघ सेमीफायनलमध्ये बाहेर पडला होता. यंदाच्या हंगामात 648 धावा करूनही रोहितला वर्ल्ड कप जिंकण्याचे आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही.

'30 मिनिटांत बदलला खेळ'

रोहित शर्मानं भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर त्यानं भावनिक ट्विट केले. रोहितनं, "जेव्हा चांगली खेळण्याची गरज होती, तेव्हा आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. 30 मिनिटांच्या आमच्या खराब खेळीमुळं आम्हाला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. माझे अंतकरण जड झालेआहे, खात्री आहे मला तुम्हालाही तसेच वाटत असेल. तरी, घरापासून लांब खेळत असतानाही चाहत्यांनी आम्हाला समर्थन केले. इंग्लंडमध्ये आम्हाला निळा रंग जास्त दिसत होता", असे ट्विट केले.

2011मध्ये वर्ल्ड कप संघात नव्हते मिळाले स्थान

रोहित शर्माला 2011च्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले नव्हते. निवड समितीनं रोहित शर्माच्या जागी युसूफ पठाणला संघात स्थान देण्यात आले होते. रोहित शर्माला आजही या गोष्टीचे वाईट वाटते. 2015च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितला संघात स्थान देण्यात आले होते. मात्र सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला पराभूत केले होते. त्यामुळं शतक करण्यापेक्षा रोहितसाठी वर्ल्ड कप जिंकणे महत्त्वाचे होते. त्यामुळं त्याला जास्त वाईट वाटले.

रोहित शतकांचा बादशाह

2011च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर 2012मध्ये रोहितनं 2 शतक केले होते. 2015मध्ये रोहितनं एकूण 22 शतक केले होते. शतक करण्यात रोहितनं विराटला मागे टाकले आहे.

वाचा- रवी शास्त्रींनी सांगितले पराभवाचे खरं कारण, धोनीबाबत म्हणाले...

वाचा- 'चौथ्या क्रमांकावर 'हा' मुंबईकर खेळाडूच होता योग्य, निवड समितीचा निर्णय चुकला'!

वाचा- मयंक अग्रवाल इंग्लंडला पोहचलाच कसा? निवड समितीवर भडकले गावस्कर

VIDEO: जगबुडीचं रौद्र रूप! मुसळधार पावसामुळे नदीनं ओलांडली धोक्याची पातळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 03:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...