World Cup : ऑन फिल्ड हिटमॅन तर ऑफ फिल्ड दम्शराज किंग, VIDEO VIRAL

मैदानावर आपल्या फलंदाजीनं सर्वांची मन जिंकणाऱ्या रोहितचा अ‍ॅक्टींग स्कील दाखवणारा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 03:45 PM IST

World Cup : ऑन फिल्ड हिटमॅन तर ऑफ फिल्ड दम्शराज किंग, VIDEO VIRAL

लंडन, 24 जून : ICC Cricket World Cupमध्ये सध्या सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती भारतीय क्रिेकेट संघाची. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळं अपराजित असा भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यामुळं भारतीय संघाचे सेमीफायनलमधले स्थान पक्के झाले आहे. यात सलामीवीर रोहित शर्मानं आपल्या फलंदाजीच्या जोरावर वर्ल्ड कपमध्ये दम दाखवला.

अफगाणिस्तान विरोधात अपयश सोडले तर, रोहित शर्मानं आपल्या फलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाशी दाणादाण उडवली. त्यानं पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी तर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली आहे. सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित सहाव्या क्रमांकावर आहे. दरम्यान भारताचा पुढील सामना हा गुरुवारी वेस्ट इंडिज विरोधात होणार आहे. या लढतीत हिटमॅनची चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल, अशी वर्तवली जात आहे. दरम्यान सध्या मैदानावर आपल्या अष्टपैलु खेळीनं गाजवणारा भारतीय संघ सध्या मैदाबाहेरही गाजवत आहे. असाच एक भारतीय संघाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताचा वेस्ट इंडिज विरुद्ध होणारा सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने रविवारी साऊदम्पटन ते ओल्ड ट्रॅफर्ड असा प्रवास केला. पाच तासाच्या या प्रवासात रोहितचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला.

या प्रवासात भारतीय संघातील खेळाडू दम्शराज हा खेळ खेळताना दिसला. यावेळी रोहितच्या अ‍ॅक्टींग स्कीलनं सर्वांची मनं जिंकली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे स्पर्धेतील अपराजित संघ आहेत. त्यामुळं या दोन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे.

वाचा-वर्ल्ड कपमध्ये पाक संघ सर्वात ढिसाळ, टीम इंडिया जगात भारी !

Loading...

वाचा-World Cup : भारत-पाक, कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा भिडणार?

वाचा- World Cup : भारतच होणार जग्गजेता, हा घ्या पुरावा!

VIDEO : 'आता माझी सटकली', बैलाने व्यापाऱ्याला लाथ मारून 8 फूट लांब फेकलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...