VIDEO : फक्त 120 सेकंदात पाहा कशी केली रोहितनं आफ्रिकन सफाई !

रोहितने संयमी खेळी करत 144 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 08:51 AM IST

VIDEO : फक्त 120 सेकंदात पाहा कशी केली रोहितनं आफ्रिकन सफाई !

साउथॅम्पटन, 06 जून : भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन मिशन वर्ल्ड कपला दणक्यात सुरुवात केली आहे. पण या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधलं ते, हिटमॅन रोहित शर्मा यानं. त्याच्या संयमी शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली लवकर बाज झाला. त्यानंतर रोहित शर्मानं फलंदाजीची सुत्र आपल्या हाती घेतली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेनं 50 षटकांत 9 बाद 227 धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना एका पाठोपाठ बाद केलं. आफ्रिकेटचा कर्णधार फाफ डुप्लेसी, डेव्हिड मिलर, अँडी पेहलुक्वायो आणि ख्रिस मोरिस यांना 30 पेक्षा जास्त धावा करता आल्या. सलामीवीर हाशिम आमला आणि क्विंटन डीकॉक स्वस्तात बाद झाले. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना, भारताचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज केएल राहुलने रोहित शर्मासोबत 85 धावांची भागिदारी केली.



केएल राहुलला राबाडाने बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. त्यानंतर रोहित शर्मा आणि धोनीने डावाची सूत्रे हाती घेतली. विजयासाठी 13 धावा हव्या असताना धोनी बाद झाला. त्यानंतर पांड्या आणि रोहित शर्माने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

Loading...

रोहितनं मिळवले दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

दक्षिण आफ्रिकेविरोधात अर्धशतक पुर्ण करताच रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा ओलांडला. आफ्रिकेविरुद्ध सामन्याआधी रोहित शर्माच्या खात्यात 11 हजार 926 धावा जमा होत्या. 12 हजार धावा पूर्ण करण्यासाठी रोहितचा ७४ धावांची गरज होती. त्या धावा करत रोहितने हा पल्ला गाठला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित नववा खेळाडू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विरेंद्र सेहवाग, मोहम्मद अझरुद्दीन आणि सुनिल गावसकर यांनी हा पल्ला गाठला आहे

15 ओव्हरमध्ये बनवतो बुलेट ट्रेन सारख्या धावा

रोहितची आकडेवारी पाहिली तर, आपल्या लक्षात येईक की, 11 ते 35 ओव्हरमध्ये रोहितनं धावा केल्या आहेत. यात रोहित 8व्या क्रमांकावर आहे. मात्र शेवटच्या 15 ओव्हरमध्ये रोहितनं सर्वात जलद धावा केल्या आहेत. पहिल्या10 ओव्हरमध्ये रोहितचा स्ट्राईक रेट 75 आहे तर, 11 ते 35 ओव्हरमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 101.22 आहे. तर, शेवटच्या 15ओव्हरमध्ये रोहित 153.56च्या स्ट्राईक रेटनं धावा करतो. तरी त्याला धिम्या गतीचा फलंदाज म्हटले जाते.


रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 08:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...