World Cup : '...आणि रोहित शर्मानं पाकिस्तानला 17 धावांनी हरवले'

दक्षिण आफ्रिकेविरोधात अर्धशतक पुर्ण करताच रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा ओलांडला.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 03:00 PM IST

World Cup : '...आणि रोहित शर्मानं पाकिस्तानला 17 धावांनी हरवले'

लंडन, 06 जून : भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन मिशन वर्ल्ड कपला दणक्यात सुरुवात केली आहे. पण या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधलं ते, हिटमॅन रोहित शर्मा यानं. त्याच्या संयमी शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली लवकर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मानं फलंदाजीची सुत्र आपल्या हाती घेतली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेनं 50 षटकांत 9 बाद 227 धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना एका पाठोपाठ बाद केलं. आफ्रिकेटचा कर्णधार फाफ डुप्लेसी, डेव्हिड मिलर, अँडी पेहलुक्वायो आणि ख्रिस मोरिस यांना 30 पेक्षा जास्त धावा करता आल्या. सलामीवीर हाशिम आमला आणि क्विंटन डीकॉक स्वस्तात बाद झाले. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना, भारताचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज केएल राहुलने रोहित शर्मासोबत 85 धावांची भागिदारी केली. केएल राहुलला राबाडाने बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. त्यानंतर रोहित शर्मा आणि धोनीने डावाची सूत्रे हाती घेतली. विजयासाठी 13 धावा हव्या असताना धोनी बाद झाला. त्यानंतर पांड्या आणि रोहित शर्माने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

रोहितच्या नाबाद 122 खेळीनंतर सोशल मीडियावर त्याची तारिफ केली जात आहे. पण काही चाहत्यांनी रोहितनं पाकिस्तानला 17 धावांनी हरवले असे मीम्स व्हारयल झाले आहेत.



पाकिस्ताननं पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजकडून लाजीरवाणा पराभव स्विकारला होता. पाकिस्तानचा संपुर्ण संघ 105 धावांवर बाद झाला होता. त्यामुळं रोहितनं पाकिस्तानला 17 धावांनी पराभूत केले असे मीम्स व्हायरल होत आहेत.



तर, काही चाहत्यांनी दक्षिण आफ्रिकेची मस्करी करत, काही मीम्स बनवले आहेत.



याशिवाय रोहित शर्माच्या शतकी खेळीचे सचिन तेंडुलकर, अमित शाह, राजनाथ सिंह यांनी कौतुक ट्विटवरवरुन केले आहे.





रोहितनं मिळवले दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

दक्षिण आफ्रिकेविरोधात अर्धशतक पुर्ण करताच रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा ओलांडला. आफ्रिकेविरुद्ध सामन्याआधी रोहित शर्माच्या खात्यात 11 हजार 926 धावा जमा होत्या. 12 हजार धावा पूर्ण करण्यासाठी रोहितचा ७४ धावांची गरज होती. त्या धावा करत रोहितने हा पल्ला गाठला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित नववा खेळाडू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विरेंद्र सेहवाग, मोहम्मद अझरुद्दीन आणि सुनिल गावसकर यांनी हा पल्ला गाठला आहे

वाचा- VIDEO : फक्त 120 सेकंदात पाहा कशी केली रोहितनं आफ्रिकन सफाई !

वाचा-World Cup : रोहितला शहाणपणा शिकवण्याआधी हे वाचा...

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-World Cup : सामना जिंकूनही टीम इंडियाला फटका, गुणतालिकेत 'हा' संघ पहिल्या क्रमांकावर


खुशखबर! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...