World Cup : रोहितला बाद दिल्यानं थर्ड अंपायर ट्रोल, रितिकासुद्धा भडकली, VIDEO VIRAL

ICC Cricket World Cup : आयपीएलप्रमाणे आता वर्ल्ड कपमध्येसुद्धा पंचांच्या चुकीचा फटका खेळाडूंना बसताना दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 08:25 PM IST

World Cup : रोहितला बाद दिल्यानं थर्ड अंपायर ट्रोल, रितिकासुद्धा भडकली, VIDEO VIRAL

मँचेस्टर, 27 जून : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात रोहित शर्माला बाद करून केमार रोचने पहिला धक्का दिला. रोहित शर्माला बाद नसताना बाद दिल्याची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे. रोहित शर्माच्या झेलबादचे अपिल मैदानावरील पंचांनी फेटाळून लावलं होतं. त्यानंतर डीआरएस रिव्ह्यूमध्ये रोहितला बाद देण्यात आलं.रोहितला बाद देणाऱ्या तिसऱ्या पंचांना सोशल मिडीयावर ट्रोल केलं जात आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते तशीच पट्टी आता मैदानावरील पंचांनी बांधली असल्याचा टोला एका युजरने लगावला आहे.

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा फक्त 18 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही रोहित शर्मा एक धाव काढून बाद झाला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या भारताला वेस्ट इंडिजचा गोलंदाज केमार रोचने पहिला धक्का दिला. त्याच्या गोलंदाजीव रोहित शर्मा यष्टीरक्षक शाय होपकडे देल देऊन बाद झाला.

Loading...

रोहित शर्माच्या झेलबादचे अपिल केल्यानंतर मैदानावरील पंचांनी ते फेटाळून लावलं होतं. मात्र, वेस्ट इंडिजने डीआरएस घेतला. यात तिसऱ्या पंचांनी रोहितला बाद दिलं. यावेळी मैदानावरील पंचांची प्रतिक्रियासुद्धा सोळल मिडियावर व्हायरल होत आहे.

रोहित टिव्ही रिप्लेमध्ये चेंडू बॅटला नाही तर पॅडला लागून गेल्याचं दिसत होतं. त्यातही बॅट आणि पॅड दोन्हीही चेंडूच्या जवळ असल्यानं नेमका चेंडू कशाला लागला हे स्पष्ट झालं नाही. तिसऱ्या पंचांनी अल्ट्रा एजमध्ये पाहून रोहित शर्माला झेलबाद दिलं. हा निर्णय दिल्यानंतर रोहितलासुद्धा धक्का बसला. त्याने पंचांचा निर्णय मान्य केला आणि मैदान सोडले. पण त्याला वाटत होते की चेंडू बॅटला लागलेला नाही. मैदानावरून बाहेर जाताना पंचांच्या निर्णयावर त्याची नाराजी लपून राहिली नाही. त्याचवेळी पॅव्हेलियनमध्ये बसलेली रोहितची पत्नी रितिकाने यावर रिअॅक्शन दिली.

वाचा- World Cup IND vs WI : 'माही मार रहा है', आज सिद्ध करून दाखवण्याची संधी!

वाचा- गेली 23 वर्ष भारत 'या' संघाविरुद्ध अपराजीत राहिला; आज काय होणार?

वाचा- सामन्याआधीच भारतानं इंग्लंडला दिला दणका, हिसकावून घेतले पहिले स्थान

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीची राजकीय बॅटिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 05:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...