World Cup : अखेर ऋषभ पंतची संघात होणार एण्ट्री, 'या' खेळाडूचा पत्ता कट?

भारतीय संघाला वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी एका विजयाची गरज आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 12:49 PM IST

World Cup : अखेर ऋषभ पंतची संघात होणार एण्ट्री, 'या' खेळाडूचा पत्ता कट?

लंडन, 28 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघानं वेस्ट इंडिजला नमवत सेमीफायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, प्रथम फलंदाजी करताना भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज रोहित शर्मा, विराट आणि राहुल मोठी खेळी करतात तेव्हा मोठं आव्हान उभा करता येतं. तर जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांच्या माऱ्यासमोर धावा करणं प्रतिस्पर्धी संघाला कठीण होतं. गेल्या दोन वर्षांत भारताने मिळवलेल्या विजयात हेच मोठं कारण आहे. दरम्यन भारतासमोर मधल्या फळीत खेळणाऱ्या फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. अनेकदा मोक्याच्या क्षणी मधली फळी ढेपाळलेली दिसली आहे.

वेस्ट इंडिज विरोधातही भारताची आघाडीची फळी फेल ठरली. रोहित शर्मा 18 धावांवर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी भागिदारी केली. मात्र 48 धावावंर राहुल बाद झाला. त्यांनतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या विजय शंकरला या सामन्यातही चांगली फलंदाजी करता आली नाही. शंकर 14 धावा करत बाद झाला. तर,केदार जाधवनं केवळ 7 धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि धोनी यांनी भारताचा डाव सावरला. या दोन्ही खेळाडूंनी सहाव्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी केली आणि भारतानं वेस्ट इंडिजपूढे 269 धावांचे आव्हा ठेवले.

चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम

वर्ल्ड कपमध्ये 5 सामन्यात भारताने चार नंबरवर तीन फलंदाज खेळवले. यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. पांड्या नेहमी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो पण सामन्यातील परिस्थिती पाहून त्याला बढती दिली गेली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलला संधी देण्यात आली होती. चौथ्या क्रमांकासाठी तोच योग्य पर्याय होता. मात्र, शिखर धवन स्पर्धेला मुकल्यानं त्याला सलामीला उतरावं लागत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्ध विजय शंकर चौथ्या क्रमांकावर उतरला. त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. तसेच रोहित आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर धावगतीचा वेगही मंदावतो. भारतासमोर सध्यातरी मधल्या फळीतील फलंदाजी डोकेदुखी ठरत आहे.

ऋषभ पंतला संघात स्थान हवे

Loading...

वर्ल्ड कपमध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विजय शंकरनं चांगली फलंदाजी केली नाही आहे. त्यामुळं शंकरच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यास हरकत नाही. तसेच, विजय शंकरनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 सामन्यात 223 धावा केल्या आहेत. त्यामुळं चाहत्यांनी ऋषभ पंतला संघात स्थान द्यावे अशी मागणी केली आहे.

सेमीफायनलसाठी भारताला एका विजयाची गरज

भारतीय संघानं वर्ल्ड कपमध्ये 6 सामने खेळले आहेत. त्यातील 5 सामने जिंकत भारतीय संघ गुणतालिकेत 11 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला अंतिम 4 संघात पोहचण्यासाठी एक सामना जिंकावा लागणार आहे. 12 गुणांसह भारत सेमीफायनल गाठू शकतो.

वाचा- भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश, सेमीफायनलची समीकरणे बदलली

वाचा- World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!

वाचा- VIDEO : पाहा पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 12:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...