World Cup : 'चाहत्यांचे आभार , संघासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार'

World Cup : 'चाहत्यांचे आभार , संघासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार'

सेमीफायनलमध्ये जडेजाची 77 धावांची खेळी वर्ल्ड कपमधली दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.

  • Share this:

मॅंचेस्टर , 11 जुलै : ICC Cricket World Cupच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरोधात भारताला पराभवाचा धक्का बसला आणि वर्ल्ड कप जिंकण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र, या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधले ते रवींद्र जडेजानं. न्यूझीलंडन दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 221 धावांवर बाद झाला. पहिल्या 10 षटकांत भारतानं 4 विकेट गमावल्या, त्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचा डाव सांभाळला. मात्र दोन्ही फलंदाज बेजबाबदारपणे फटके मारून बाद झाले. मोक्याच्या क्षणी या दोन विकेट गेल्यानंतर आठव्या क्रमांकावर आलेल्या रवींद्र जडेजानं भारताचा डाव सावरला.

जडेजाने धोनीसोबत 100 धावांची अभेद्य भागिदारी करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात जडेजा 77 धावांवर बाद झाला. यानंतर जडेजा वर्ल्ड कपमध्ये या क्रमांकावर दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कुल्टर नाइलने वेस्ट इंडिजविरुद्ध 92 धावांची खेळी केली होती.

त्यामुळं भारताच्या पराभवानंतरही सोशल मीडियावर जडेजावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. दरम्यान पराभवानंतर आज रविंद्र जडेजाने आपली प्रतिक्रिया दिली. त्यानं ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहे. जडेजानं आपल्या ट्विटमध्ये, "कधीच हार मानू नये, पराभवनंतर कसं उभं रहायचे हे मला नेहमीच खेळानं शिकवलं आहे. मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. पण मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार", असे म्हणाला आहे.

दरम्यान न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननेही सामन्यानंतर जडेजाच्या खेळीचं कौतुक केलं आहे. जडेजानं केवळ फलंदाजी नाही तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी केली. दहा षटकांत केवळ 32 धावा देत एक बळी घेतला. तर, क्षेत्ररक्षण करताना एका फलंदाजाला धावबाद केलं. त्यामुळं जाडेजाच्या या अष्टपैलू खेळीचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. संपुर्ण स्पर्धेत जडेजाला साखळी फेरीत फक्त एकच सामना खेळायला मिळाला होता. लंकेविरुद्धच्या सामन्यात जडेजाने 10 षटके टाकत 1 गडी बाद केला होता. त्या सामन्यात त्याला फलंदाजीला संधी मिळाली नव्हती.

वाचा- World Cup: धोनीच बाद होणं लागलं जिव्हारी, चाहत्याचा झाला मृत्यू!

वाचा- WORLD CUP : टीम इंडियाने सामना हरला पण तरीही भारतच चॅम्पियन!वाचा- World Cup : पराभवानंतर धोनीला केन विल्यम्सननं दिली ही ऑफर, पाहा VIDEO

VIDEO: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 11, 2019, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading