…आणि शास्त्री गुरुजी म्हणाले अभी तो मै जवान हूं, VIDEO व्हायरल

…आणि शास्त्री गुरुजी म्हणाले अभी तो मै जवान हूं, VIDEO व्हायरल

भारताचा विश्वचषकातला पहिला सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे.

  • Share this:

लंडन, 30 मे : जगभरातील क्रिकेटप्रेमी ज्या स्पर्धेची गेली पाच वर्ष वाट पाहत होते, त्या विश्वचषक स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिला सामना इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात ओव्हलच्या मैदानावर होत आहे. मात्र, भारतीय क्रिकेटप्रेमी वाट पाहत आहेत, ते भारताच्या सामन्यांची. भारतानं याआधी इंग्लंडमध्ये दोन सराव सामने खेळले, त्यात न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला तर, बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारतानं आपली जमेची बाजू दाखवली आणि विजय मिळवला.

भारताचा विश्वचषकातला पहिला सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. दरम्यान त्याआधी भारतीय संघ मैदानावर सरावासाठी पोहचण्याआधी प्रवासादरम्यान मजा मस्ती करताना दिसत आहे. यावेळी भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनं, संघाच्या सपोर्ट स्टाफला आपल्या ‘चहल टीव्ही’ या कार्यक्रमात बोलतं केलं आहे.

चहलचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात चहलने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, फिजीओ पॅट्रीक फराहत यांच्याशी गप्पा मारल्या. यावेळी चहलनं प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशीही गप्पा मारल्या. यावेळी चहलनं त्यांना त्यांच्या वर्ल्डकपच्य आठवणींबाबत विचारले असता, रवी शास्त्रींनी, अभी तो मै जवान हूं, असा गमतीशीर डायलॉग मारला. बीसीसीआयने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकला आहे. त्यामुळं भारतीय संघाचे कोच शास्त्री गुरुजी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, बांगलादेशविरुद्ध सराव सामन्यात लोकेश राहुलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत शतक झळकावलं, त्यामुळे भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा आता सुटला आहे. दरम्यान भारताचा पहिला सामना साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे तर, ज्या सामन्यांची सगळे वाट पाहत आहेत तो भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायवोल्टेज सामना 16 जूनला होणार आहे. दरम्यान भारत हा यंदाच्या विश्वचषकाता प्रबळ दावेदार मानला जातो.

वाचा- England vs South Africa : IPL गाजवणारा 'हा' खेळाडू ठरला गोल्डन डकचा मानकरी

वाचा- हा कसला वर्ल्ड कप, स्पर्धेतील बदलावर सचिन नाराज

वाचा- आपलंच नाव गुगलवर सर्च करतो हा खेळाडू, जडेजाने केला खुलासा

VIDEO : मोदींच्या शपथविधीला ममता राहणार अनुपस्थित; या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: May 30, 2019, 6:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading