World Cup : रवी शास्त्रींनी सांगितले पराभवाचे खरं कारण, धोनीबाबत म्हणाले...

भारताच्या पराभवानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितली पराभवाची कारणे.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 09:58 AM IST

World Cup : रवी शास्त्रींनी सांगितले पराभवाचे खरं कारण, धोनीबाबत म्हणाले...

लंडन, 12 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतानं सेमीफायनलमध्ये खराब फलंदाजी केली. त्यामुळं भारताचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले आणि न्यूझीलंडनं फायनलमध्ये प्रवेश केला. पराभवानंतर भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांनी मान्य केले की, चौथ्या क्रमांकानं भारतीय संघाचा घात केला. रवी शास्त्री यांनी पराभवानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत भारताची कमकुवत बाजू सांगितली.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी, "चौथे स्थान हे आमच्यासाठी या वर्ल्ड कपमध्ये चिंतेचा विषय राहिला आहे. सुरुवातीला केएल राहुलला या स्थानावर संधी दिली होती. मात्र, शिखर धवन जखमी झाल्यानंतर राहुलला सलामीसाठी उतरवण्यात आले. त्यानंतर विजय शंकरही जखमी झाला. त्यामुळं चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आमच्यासमोर कायम होता". त्यामुळं आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर भारताला मधली फळी सावरू शकली नाही. अखेर जडेजा आणि धोनीनं भारताची बाजू सावरली. दोघांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. मात्र जडेजा आणि धोनी भारताचा पराभव रोखू शकले नाही.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात केवळ 24 धावांत भारताचे चार फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर धोनी आणि हार्दिक पांड्या यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना हैराण केले.

म्हणून धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवले.

मयंक अग्रवालला सलामीला पाठवून राहुलला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याबाबत शास्त्रींना विचारले असता, "असे बदल नेहमीचा चालतात असे नाही. जर आणखी एक सामना असता, तर असे बदल केले असते", असे सांगितले. तर धोनीबाबत बोलताना, "धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवणे हा संघाचा निर्णय होता. धोनी चांगला फिनीशर आहे, त्यामुळं आम्हाला त्याची गरज होती. त्याकरिता त्याला आम्ही उशीरा फलंदाजीसाठी पाठवले", असे सांगितले.

वाचा- IPLचा 'हा' नियम वर्ल्ड कपमध्ये का नाही? विराटचा ICCला सवाल

वाचा- World Cup : विराट नाही तर वर्ल्ड कपनंतर रोहितकडे असणार कर्णधारपद?

वाचा- World Cup : हिटमॅनची एक धाव, फायनलमध्ये दोन फलंदाजांना शतकाची गरज!

SPECIAL REPORT : धोनी भावूक झाला आणि चाहत्यांचा बांध फुटला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 09:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close