मॅंचेस्टर, 26 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाची विजयी घौडदौड सुरु आहे. भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, त्यामुळं सेमिफायनलचे तिकीट जवळजवळ फिक्स झाले आहेत. गुरुवारी भारत वेस्ट इंडिज विरोधात खेळणार आहे. हा भारताचा सहावा सामना असेल, भारतानं चार सामन्यात विजय मिळवला आहे तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळं रद्द करण्यात आला.
दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघानं 6 सामन्यात केवळ एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 4 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे, असे असले तरी न्यूझीलंड विरोधात वेस्टइंडिजनं चांगली फलंदाजी केली होती. मात्र, इंडिजचा तुफानी फलंदाज आंद्रे रसेल दुखापतींमुळं बाहेर पडला आहे. त्यामुळं भारताची चिंता मिटली असली तरी, या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
भारत-वेस्टइंडिज यांचा सामना मॅंचेस्टरच्या मैदानावर खेळला जाणार आहे. याच मैदानावर भारतानं पाकिस्तानला मात दिली होती. मात्र पावसामुळं आता वेस्टइंडिज विरोधातला सामना रद्द होण्याची शक्यता आहे. जर, पावसामुळं सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात येतील. याचा तोटा भारताला होऊ शकतो.
भारताच्या सरावावरही फिरले पाणी
भारतीय संघ जिथे जिथे सामना खेळण्यास जात आहे, त्यांच्या मागे-मागे पाऊसही येत आहे. मँचेस्टर येथील सामन्यासाठी मंगळवारच्या सराव सत्रावर पावसानं पाणी फिरवले असले तरी गुरुवारी पावसाची शक्यता फार कमीच आहे.
Not the ideal conditions for training today ☹ pic.twitter.com/la1uheffS8
— BCCI (@BCCI) June 25, 2019
सामन्यात पाऊसाचा व्यत्यय नाही
पावसामुळं सराव सामना रद्द झाला असला तरी, हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पावसाची शक्यता कमी आहे. बुधवारी काही काळ पाऊस पडू शकतो, मात्र गुरुवारी पावसाची शक्यता कमी आहे.
अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी